AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटील हरवले हो… गावागावात लागले पोस्टर्स; ठाकरे गटाने नाही तर मग कुणी लावले पोस्टर्स?

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आंदोलन केलं आहे. नऊ महिन्यांपासून पाटील बुलढाण्यात फिरकलेच नसल्याने येथील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

गुलाबराव पाटील हरवले हो... गावागावात लागले पोस्टर्स; ठाकरे गटाने नाही तर मग कुणी लावले पोस्टर्स?
gulabrao patil Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 23, 2023 | 12:25 PM
Share

बुलढाणा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावात सभा होणार आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच उद्धव ठाकरे यांचं शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. ही डोकेदुखी असतानाच गुलाबराव पाटील यांची आणखी एका गोष्टीने डोकेदुखी वाढली आहे. बुलढाण्यात गावोगावी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पोस्टर्स लागले आहेत. गुलाबराव पाटील हरवले आहेत… असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. पोस्टर्स लावणाऱ्यांनी गुलाबरावांच्या विरोधात आंदोलनही केलं आहे. विशेष म्हणजे आंदोलन करणारे आणि पोस्टर्स लावणारे ठाकरे गटाचे नाहीत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची अडचण अधिकच वाढली आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते बुलढाण्यात फिरकलेच नाहीत. जळगाव ते मुंबई आणि मुंबई ते जळगाव एवढ्यापुरतच त्यांनी स्वत:ला मर्यादित केल्याने येथील नागरिकांमध्ये संताप आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी बुलढाण्यातील गावागावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावले आहेत. शोधून देणाऱ्यांना पैसेही जाहीर केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये सध्या या पोस्टर्सची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

51 रुपये बक्षीस

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. पोस्टरवर गुलाबराव पाटील यांचा फोटो आहे. त्यावर पालमंत्री बेपत्ता असं लिहिलं आहे. तसेच शोधून देणाऱ्यांना 51 रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपर्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी स्वत:चं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. गावागावातील नाक्यानाक्यावर, चहा आणि पान टपऱ्यांवर हे पोस्टर्स लावले आहेत. हे पोस्टर्स पाहण्यासाठी गावागावात झुंबड उडाली असून नाक्यावर, चहाच्या टपऱ्यांवर, चावडीवर आता या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

gulabrao patil

gulabrao patil

नऊ महिन्यांपासून गायब

शिंदे सरकार स्थापन होऊन जवळपास दहा महिने झाले, पालकमंत्र्यांची नियुक्ती होऊन नऊ महिने झाले, या काळात अतिवृष्टी तर कुठे चक्रीवादळामुळे शेतकरी त्रस्त असताना अद्यापही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केलेला नाही. पाटील यांनी साधं शेतकऱ्यांचा सांत्वन सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील अनेक गावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर झळकवले आहेत. जागोजागी अनेक ठिकाणी मुख्य महामार्गावर तर गावातील पान टपऱ्यांवर हे पोस्टर झळकत आहेत. नागरिकही हे पोस्टर बघून कुतूहल व्यक्त करत आहेत.

संघटनेचं आंदोलन

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. गुलाबराव पाटील गेले कुठे? कधी येणार गुलाबराव? अशा घोषणा या आंदोलकांनी दिल्या असून सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या आहेत.

Follow Us
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल- सूत्रांची माहिती
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?