आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते; हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

| Updated on: Jul 16, 2021 | 5:30 PM

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशमुख यांची सुमारे चार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यावरून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीलाच सवाल केला आहे. (anil deshmukh's property)

आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते; हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल
हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
Follow us on

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशमुख यांची सुमारे चार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यावरून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीलाच सवाल केला आहे. एखाद्या आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवालच हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (hasan mushrif first reaction on Ed attached anil deshmukh’s property)

अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्याची बातमी आल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधला. परमवीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मुकेश अंबानी यांच्या घरा बाहेर स्फोटक ठेवली त्याचा उलगडा झाला नाही. स्फोटक का ठेवली? मास्टर माईंड कोण याचा शोध एनआयए घेऊ शकली नाही. वाझेची चौकशी बाजूलाच राहिली. आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवाल करतानाच मुद्दाम हे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

भाजपच्या इशाऱ्यावर काम

सीबीआय, ईडी या संस्था भाजपच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. या संस्था जे जे विरोधक असतील त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पटोलेंना सल्ला

पक्ष वाढवण हा सर्वचा अधिकार आहे. मात्र या मूळ मित्र पक्ष दुखावणार नाही याची खबरदारी नाना पटोले यांनी घ्यावी, असा सल्ला त्यांनी पटोलेंबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर दिला.

ईडीची कारवाई ही चपराक

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देशमुखांवरील ईडी कारवाईचं समर्थन केलं आहे. ‘राजकीय सुडापोटी केंद्र सरकार काम करत आहे, तपास एजन्सी काम करत आहेत, असे आरोप करणऱ्यांना आजची अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली आहे. ईडीच्या तपास प्रक्रियेत देशमुख यांची ही प्रॉपर्टी मिळालीय आणि ती जप्त झालीय याचा अर्थ असा की, अशी प्रॉपर्टी होती. म्हणूनच त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत व तपासात तथ्य आहे. म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे. पण कोणत्याही तपास यंत्रणेला मनमानी करता येत नाही, असे आपण नेहमीच सांगायचो. त्यामुळे भाजपा, केंद्र सरकार व तपास यंत्रणेवर आरोप करणाऱ्यांचे आता तरी यामुळे समाधान होईल. कारण आता या प्रकरणात तथ्य आहे आणि भविष्यामध्ये यामधील एक एक गोष्टी आणि सत्य लोकांसमोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणी सिंग यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाची ईडीकडून तपासणीही सुरू झाली. त्यानंतर आज ईडीने अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांचीही मालमत्ता मुंबई आणि नागपूरमधील असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (hasan mushrif first reaction on Ed attached anil deshmukh’s property)

 

संबंधित बातम्या:

माजी गृहमंत्री अनिल देशुमखांवर ईडीची मोठी कारवाई, देशमुखांच्या कोण-कोणत्या संपत्तीवर टाच?

ज्या अनिल देशमुखांची ईडीनं 4 कोटींची संपत्ती जप्त केली, ते नेमक्या किती प्रॉपर्टीचे धनी?

काँग्रेस स्वबळावर लढणार?, विजय वडेट्टीवार म्हणतात, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही

(hasan mushrif first reaction on Ed attached anil deshmukh’s property)