पश्चिम विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा; या शेतपिकांचे झाले नुकसान, कुठे काय परिस्थिती?

| Updated on: Apr 01, 2023 | 9:36 AM

काही ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. चिंचपूर येथील शाळेचे छत उडाले. रात्रीची वेळ असल्यानं थोडक्यात निभावले.

पश्चिम विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा; या शेतपिकांचे झाले नुकसान, कुठे काय परिस्थिती?
Follow us on

अकोला : अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला (Akola) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिंचपूर येथील शाळेचे छत उडाले. रात्रीची वेळ असल्यानं थोडक्यात निभावले. शाळेची वेळ राहिली असती तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असते. नादुरुस्त शाळा दुरुस्त करणे आवश्यक आहे. याकडे जिल्हा परिषदेने (zp school) लक्ष द्यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

फळा-फुलांचे मोठे नुकसान

अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातल्या आगीखेड, खामखेड शिवारात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी संध्याकाळी हजेरी लावली. त्यामुळे कांदा बीजोत्पादन, उन्हाळी पीक, फळ आणि फूल पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

वाऱ्याचा जोर जास्त असल्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या वादळी वाऱ्यासह या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संघटना सापडलाय.

वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला

दुसरीकडं, बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आधीच बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 115 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र काल पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे. खामगाव तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसाने रडवल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळतंय. वादळी वाऱ्यामुळे चिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून शाळेच्या इमारतीचे मोठ नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची चांगलीच उडाली तारांबळ

वारा एवढा जोरदार होता की, काही झाडं उन्मळून पडली. सोसाट्याच्या वाऱ्यात काही वस्तू उडून गेल्या. काही ठिकाणी टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला माल झाकून ठेवावा लागता. शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू होताच लोकांनी घरचा रस्ता धरला.