Chandrapur | चंद्रपूरच्या पाथरी गावात बिबट्याचा घरात घुसून धुमाकूळ, परिसरात भीतीचं वातावरण!

| Updated on: Jun 30, 2022 | 11:48 AM

जिल्ह्यात घरात बिबट घुसल्याने खळबळ उडाली आहे. सावली तालुक्यातील पाथरी गावात आज पहाटे ही घटना उजेडात आली. घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेवून हा बिबट घुसला. पाथरी गावातील गोपाल ठिकरे यांच्या घरात बिबट घुसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. बचाव दलाच्या पथकाने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Chandrapur | चंद्रपूरच्या पाथरी गावात बिबट्याचा घरात घुसून धुमाकूळ, परिसरात भीतीचं वातावरण!
Image Credit source: tv9
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात घरात बिबट्या (Leopards) घुसल्याने गावात एकच उडाली आहे. सावली तालुक्यातील पाथरीगावत ही धक्कादायक घटना घडलीयं. आज पहाटे घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेवून बिबट्या थेट घरात शिरला. पाथरी गावातील गोपाल ठिकरे यांच्या घरात बिबट घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाची टीम (Forest Department) घटनास्थळी दाखल झाली आणि बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात मानवी वस्तीवर बिबट्या येण्याची ही काही पहिली घटना नाहीयं. मात्र, घरातच बिबट्या घुसल्याने आता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरात बिबट घुसल्याने उडाली खळबळ

जिल्ह्यात घरात बिबट घुसल्याने खळबळ उडाली आहे. सावली तालुक्यातील पाथरी गावात आज पहाटे ही घटना उजेडात आली. घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेवून हा बिबट घुसला. पाथरी गावातील गोपाल ठिकरे यांच्या घरात बिबट घुसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. बचाव दलाच्या पथकाने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अजून बिबट्या वनविभागाच्या हाती लागला नाहीयं. यादरम्यान मात्र बघ्यांची मोठी गर्दी जमलीयं, लोक जिथे जागा मिळेल तेथे उभे राहून बिबट्याला पकडताना बघत आहेत.

हे सुद्धा वाचा

बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू

काही दिवसांपूर्वी आजोबाच्या मृत्यूनंतर कार्यक्रमासाठी आलेल्या प्रतीकला अचानक बिबट्याने उचलून नेले होते. त्यानंतर त्याने आरडाओरड करताच शेजारी आणि नातेवाईकांनी धावाधाव करायला सुरुवात केली. लगेच मागील भागात असलेल्या जंगलाकडे धाव घेण्यात आली. वनविभागाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र, शोधमोहीमदरम्यान प्रतिकचा घरापासून 500 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. संतप्त नागरिकांची वनविभाग आणि प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी देखील केली होती.