Akola | वंचितवर आरोप करणाऱ्या संतोष बांगरांना प्रत्युत्तर, Rajendra Patode म्हणतात, एक हजार कोटींचे आरोप बालीशपणाचे

| Updated on: Mar 26, 2022 | 10:44 AM

गेल्या निवडणुकीत त्यांनी एक हजार कोटी रुपये घेऊन हेलिकॅप्टरने प्रचार केला. याचा फायदा भाजपला झाला. वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप संतोष बांगर यांना शिवसंपर्क मेळाव्यात केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन विकास आघाडीचे महासचिव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

Akola | वंचितवर आरोप करणाऱ्या संतोष बांगरांना प्रत्युत्तर, Rajendra Patode म्हणतात, एक हजार कोटींचे आरोप बालीशपणाचे
वंचितचे राजेंद्र पातोडे, शिवसेनेचे संतोष बांगर
Image Credit source: facebook
Follow us on

अकोला : वंचित वर बालीश आरोप करणारा शिवसेनेचा पाचवी शिकलेल्या अडाणी अल्पशिक्षित आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) ह्याला प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करा. त्याला अंकगणित आणि बाराखडीची पुस्तके उपलब्ध करून द्या. त्याला साक्षर करण्याचा निर्धार युवा आघाडीने केला आहे. बौद्ध समाजाची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आला आहे. लवकरच ‘बांगरला घोडा लावू’ असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी (Vanchit Bahujan Yuva Aghadi) महासचिव आणि मीडिया पॅनलिस्ट राजेंद्र पातोडे (Media Panelist Rajendra Patode) यांनी दिला आहे. शिवसेनेचा जुगार चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष बांगर या आमदाराने अकलेचे तारे तोडले. 1 हजार कोटी रुपयांचा हास्यास्पद व बालीश आरोप केला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडाणी बांगरला आधी प्रौढ शिक्षण शाळेत घालावे, असे निर्देश दिले आहेत. जेणेकरून त्याला एक हजारावरील शून्य वाचण्याची अक्कल आली पाहिजे. आणि आमदार बांगर ह्याने दुसरा आरोप बौद्ध समाजावर केला आहे. याचे परिणाम देखील त्याला भोगावे लागतील.

मविआ मंत्र्यांचे जेलमध्ये जाण्यासाठी स्पर्धा

राज्यात जिथे बांगर दिसेल तिथे त्याला घोडे लावण्याचे आदेश युवा कार्यकर्त्यांना दिले आहेत. बांगरने केलेले आरोप त्याने सिद्ध करावे. किंवा बिनशर्त माफी मागावी. अन्यथा बांगरला नांगर लावूच असा इशारा देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. तर एकीकडे मविआमधील मंत्र्यांची जेलमध्ये जाण्याची स्पर्धा लागली आहे. त्याची धग आता मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली आहे. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बांगर सारखे जुगारी आमदार बाश्फळ बडबड सुरू केल्याची टीका युवा आघाडीने केली आहे.

बांगर यांनी काय आरोप केले होते

हिंगोलीचे जिल्हा शिवसेना प्रमुख बांगर यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी एक हजार कोटी रुपये घेऊन हेलिकॅप्टरने प्रचार केला. याचा फायदा भाजपला झाला. वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप संतोष बांगर यांना शिवसंपर्क मेळाव्यात केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून वंचित बहुजन विकास आघाडीचे महासचिव यांनी वरील वक्तव्य केलंय.

Video Nagpur | विदर्भातून शिवसेनेला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळणार? शिवसंपर्क अभियानानंतर मुंबईत हालचाली वाढल्या

Nandurbar Accident | कंटेनर-आर्टिका गाडीचा भीषण अपघात, तीन जण ठार, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या