किरीट सोमय्या यांचे शरद पवार यांना आव्हान, म्हणाले, ”शरद पवार यांच्यात हिंमत असेल तर…”

| Updated on: Jan 16, 2023 | 7:46 PM

हसन मुश्रीफ असो, नवाब मलिक असो की, अस्लम शेख असो. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, तो जेलमध्ये जाणार, असंही किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितलं.

किरीट सोमय्या यांचे शरद पवार यांना आव्हान, म्हणाले, शरद पवार यांच्यात हिंमत असेल तर...
किरीट सोमय्या
Follow us on

कोल्हापूर : एका समाजाला धरून टीका केली जात असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. याबाबत बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणतात, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी असं विधान करावं. शरद पवार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की, हसन मुश्रीफ यांचं विधान मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन फिरतात. त्यांनीसुद्धा असं विधान करावं, असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं. पैसे चोरताना, घोटाळा करताना, ग्रामपंचायतींवर कर लावताना, इतरांच्या नावानं भ्रष्टाचाराचा पैसा पार्किंग करताना तुम्हाला धर्म आठवला नव्हता का, असा सवालही किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला.

आता तुम्हाला धर्म आठवतो का. किरीट सोमय्या कोल्हापुरात मातेचं दर्शन करायला येत होता. तेव्हा कोल्हापुरात यायला बंदी घातली होती. मंदिरात प्रवेश करताना अटक केली होती. त्यावेळी तुम्हाला धर्म नाही आठवला का, असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी विचारला.

तर ते जेलमध्ये जातील

हसन मुश्रीफ असो की, नवाब मलिक असो की, अस्लम शेख असो. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, तो जेलमध्ये जाणार, असंही किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितलं.

जंबो कोविड सेंटरचा १०० कोटींचा घोटाळा

चौकशी सुजित पाटकर, संजय राऊत यांची केली पाहिजे. जंबो कोविड सेंटरचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. कोविडमध्ये ज्यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला, त्यांची चौकशी झाली पाहिजे. लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीची चौकशी सुरू आहे. त्यांना किती पैसे दिले. कोणत्या आधारावर दिले. या सर्वांची सविस्तर माहिती मागितली गेली आहे.

तर पत्रकार परिषद घेऊन माहिती द्या

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहयोगी रोज उठून मला प्रश्न विचारत होते. त्यांना मी उत्तर देत होतो. भावना गवळी, प्रताप जाधव यांनी घोटाळे केले असतील, तर तुमचा आशिर्वाद असेल, असंही किरीट सोमय्या म्हणाले. तुमच्याकडं माहिती असेल, तर पत्रकार परिषद घेऊन माहिती द्या, असं आव्हानही किरीट सोमय्या यांनी दिलं.