“पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त”; उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं…

| Updated on: May 06, 2023 | 9:06 PM

पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त होणार असल्याचा विश्वासह त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, शिवसैनिकाचं काय होणार? अरे काय होणार काय? गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला.

पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त; उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं...
Follow us on

महाड : राज्यात सत्तांतर झाल्यापासून राज्यातील राजकारण खोके आणि ओके अशा घोषणांनी दुमदूमून जात असतानाच आता पुन्हा एकदा जय महाराष्ट्र म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभांचा धडका सुरु केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त आता उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांची कोकणातील रत्नागिरी नंतर ही महाडमधील ही दुसरी सभा अलोट गर्दीत होत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी कोकणातील नारायण राणे, रामदास कदम यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाडमधील सभेतून नाव न घेता रामदास कदम आणि त्यांच्या मुलावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी महाडमधील तसेच कोकणातील पुढचा आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचाच असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीच्या सभेसाठी मैदाने आता अपूरे पडत आहेत.त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की, शिवसेना संपली, संपवली पाहिजे असंही काही जणांना वाटत होते मात्र तर काही जणांना स्वत: म्हणजे शिवसेना वाटते असा टोला त्यांनी नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला आहे.

मात्र उद्धव ठाकरे यांनी विश्वासने म्हणाले की, ज्यांना ज्यांना वाटत होते शिवसेना संपली त्याच लोकांना मला सांगायचे आहे की, ही सर्व माणसं माझ्यासोबत आहेत असंही त्यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेतून त्यांनी नारायण राणे, रामदास कद यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही असं म्हणत त्यांनी राणे आणि कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे.

माझ्यावर टीका हो त असली तरी एक समाधान आहे की, माझ्यावर आरोप केल्याने भाकरी मिळते हेही नसे थोडकं असं म्हणत त्यांनी राणेंना खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

आज जगताप कुटुंब आपल्यासोबत आले आहे, त्यांचे मी सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करतो. यावेळी ते म्हणाले की, मी मातोश्रीत प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि महाडमध्ये सभा घेऊ हा हट्ट जगताप कुटुंबीयांनी केला.

यावेळी त्यांनी स्नेहल जगताप यांच्या प्रवेशावरून त्यांनी महाविकास आघाडी आणि आपल्या ठाकरे गटाचे कसे एकमत आहे तेही त्यांनी यावेळी सभेतून सांगितले. यावेळी ते म्हणाले की, स्नेहलताई आणि जगताप कुटुंबीय काँग्रेसमधून आले आहेत.

त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे काही जणांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला आहे.

पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त होणार असल्याचा विश्वासह त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, शिवसैनिकाचं काय होणार? अरे काय होणार काय? गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला.

तसं आपण काही करत नाही आहोत. आपण त्यांना काहीही न देता ते आपल्याकडे आले आहेत असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.