Satara Unlock: सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट घटला, तिसऱ्या स्तरात समावेश, निर्बंध शिथील, काय सुरु? काय बंद?

| Updated on: Jun 18, 2021 | 8:48 PM

कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडसच्या टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे.

Satara Unlock: सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट घटला, तिसऱ्या स्तरात समावेश, निर्बंध शिथील, काय सुरु? काय बंद?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

सातारा: कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडसच्या टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं जिल्हाधिकारी शेखर सिंह नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार अत्यावश्यक बाबीमध्ये येणारी दुकानं सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मध्यरात्रीपासून नवा आदेश लागू करण्यात आला आहे. (Maharashtra 5 level Unlock Satara Collector Shekhar Singh release new order regarding Unlocking rules)

सकाळी 5 ते सांयकाळी 5 पर्यंत जमावबंदी

सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत योग्य कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

ऑनलाईन शिक्षणाला परवानगी, शाळा महाविद्यालय बंद

सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.

अत्यावश्यक दुकानं सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सुरु राहणार

अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. त हॉस्पिटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे , नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील.

हॉटेल 7 ते 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेनं सुरु

सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच लॉजिंगमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीतच रेस्टॉरंट मध्ये सेवा देता येईल व त्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या रुम मध्ये सेवा पुरविणे बंधनकारक असेल.

खाजगी कार्यालयं 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. शासकीय/निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे. खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करणेस मनाई असेल.

चित्रीकरणाला नियमांच्या अधीन राहून परवानगी

चित्रीकरण – आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 05.00 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे जागेच्या इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. मात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50% क्षमतेने आयोजित करणेस परवानगी असेल.

संबंधित बातम्या:

समृद्धी महामार्गाच्या कामास गती द्या, नागपूर-शिर्डी टप्पा लवकर सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात रविवारी मॉल, सर्व दूकानं आणि सलून राहणार बंद

(Maharashtra 5 level Unlock Satara Collector Shekhar Singh release new order regarding Unlocking rules)