Maharashtra By-Election Results 2021: देगलूरचा आमदार कोण? मतदारांचा कौल काँग्रेस की भाजपला

| Updated on: Nov 02, 2021 | 9:56 AM

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीच्या निकालाची उत्कंठा वाढलीय. देगलूर बिलोलीत नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण प्रचारासाठी तळ ठोकून होते.

Maharashtra By-Election Results 2021: देगलूरचा आमदार कोण? मतदारांचा कौल काँग्रेस की भाजपला
देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
Follow us on

नांदेड: काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीच्या निकालाची उत्कंठा वाढलीय. देगलूर बिलोलीत नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण प्रचारासाठी तळ ठोकून होते. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी देखील उमेदवार दिला होता. काँग्रेसनं जितेश अंतापूरकर, भाजपनं सुभाष साबणे आणि वंचित डॉ. उत्तम इंगोले यांना उमदेवारी दिलीय. मतदारांनी नेमका कौल कुणाला दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे.

उद्या निकाल

देगलूर बिलोली पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणं आज निकाल जाहीर केला जाणार आहे.

काँग्रेस आणि भाजपकडून प्रतिष्ठा पणाला

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसची जागा खेचून आणल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. भाजपनं पंढरपूरची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यानं देगलूर बिलोलीची निवडणूक लढवली. शिवसेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना त्यांनी पक्षात स्थान देऊन उमेदवारी देण्यात आली. अशोक चव्हाण यांनी पंढरपूरच्या निकालातून धडा घेत, गेला महिनाभर देगलूर बिलोलीमध्ये तळ ठोकत जितेश अंतापूरकर यांच्या विजयासाठी प्रचारसभांचा धडाका लावला. देगलूर बिलोलीमध्ये आता कोण विजयी होणार हे पाहावं लागणार आहे.

निकाल कुठे पाहायला मिळणार?

देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होत आहे. पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची प्रत्येक अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर वाचायला मिळणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल उपलब्ध करुन दिला जाईल.

वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार प्रचार

देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप या दोन पक्षांत प्रमुख लढत होत असल्याचं चित्र सुरुवातील दिसून आलं. मात्र, वंचित बुहजन आघाडीकडून डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी देण्यात आली. इंगोले यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे वंचित आघाडीदेखील स्पर्धेत आली आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चांगलीच ताकद लावली होती.

राज्याच्या राजकारणावर परिणाम

पंढरपूर प्रमाणं देगलूर बिलोलीची पोटनिवडणूक काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे चर्चेत राहिली. या निवडणुकीचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Election Results 2021 LIVE Counting: पहिल्या फेरीत जितेश अंतापूरकर आघाडीवर, 1624 मतांचं लीड

Deglur bypoll Result | देगलूरमध्ये पुन्हा काँग्रेस, भाजपला धोबीपछाड ? वाढलेल्या मतदारांचा कल महत्त्वपू्र्ण ठरण्याची शक्यता

Deglur By Election Voting | देगलूर पोटनिवडणुकीसाठी 64 टक्के मतदान, आता उमेदवारांची धाकधूक वाढली, कौल कोणाला ?

Maharashtra Deglur Biloli by election result will declare today Congress and BJP claim winning seat