VIDEO | दारुसाठी ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, साताऱ्यात मद्यपी 80 फूट उंच विजेच्या टॉवरवर चढला, 11 तासांचा थरार

दिनकर थोरात

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 10:26 AM

दारुचे व्यसन सोडवण्यासाठी नातेवाईकांनी या व्यक्तीला कोयनानगर येथील व्यसनमुक्ती केंद्रात आणले होते. मात्र दारु प्यायची असल्याचा हट्ट करत तो चक्क वीज वाहिनीच्या हाय व्होल्टेज टॉवरवरच चढला

VIDEO | दारुसाठी 'हाय व्होल्टेज' ड्रामा, साताऱ्यात मद्यपी 80 फूट उंच विजेच्या टॉवरवर चढला, 11 तासांचा थरार
साताऱ्यात मद्यपीचा विद्युत टॉवरवर धिंगाणा

Follow us on

कराड : दारुसाठी झालेला ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा साताऱ्यात पाहायला मिळाला. नातेवाईक दारु देत नाहीत, म्हणून मद्यपी विजेच्या मुख्य टॉवरवर चढल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. त्याच्या सुटकेसाठी विद्युत प्रवाह बंद करुन बचाव मोहीम हाती घ्यावी लागली. कोयनानगर येथील दास्तान गावात घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

मद्यपीचे नाव करिअप्पा तुकाराम कंटेकर असून तो बेळगाव आथणी येथील रहिवासी आहे. त्याचे दारुचे व्यसन सोडवण्यासाठी नातेवाईकांनी त्याला कोयनानगर येथील व्यसनमुक्ती केंद्रात आणले होते. मात्र दारु प्यायची असल्याचा हट्ट करत तो चक्क वीज वाहिनीच्या हाय व्होल्टेज टॉवरवरच चढला आणि जवळपास 11 तास धिंगाणा घातला

नेमकं काय घडलं?

मद्यपी टॉवर चढला असताना विद्युत प्रवाह सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे त्यांनी आधी विद्युत प्रवाह बंद करुन घेतला. तरीही मद्यपी विद्युत प्रवाहाच्या तारेलाच धरुन बसला होता. मद्यपीमुळे मुख्य विद्युत प्रवाह बंद करुन गावकऱ्यांना ताटकळत राहावे लागले.

विद्युत महामंडळाचे नुकसान

80 फूट उंचावर चढलेल्या मद्यपीला वाचवण्यासाठी रात्रभर प्रयत्न सुरु होते. बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास टॉवरवर चढलेल्या मद्यपीला सुरक्षित खाली उतरवण्यात गुरुवारी पहाटेचे 5 वाजले. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, पोलिस प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. मात्र मुख्य विद्युत प्रवाह खंडित केल्यामुळे विद्युत महामंडळाला एका मिनिटाला लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

दारुड्यांचा धिंगाणा, विरोध करणाऱ्या युवकाला शिवीगाळ, नंतर गोळ्या झाडल्या

घरासमोर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना जाब विचारला, कल्याणमध्ये व्यावसायिकावर तलवारीने वार

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI