सेना-भाजप नगरसेवकांमध्ये बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर धावून गेले, कोकणचा पॅटर्नच वेगळाय!

| Updated on: Nov 11, 2021 | 11:06 AM

सावंतवाडीच्या नगरपरिषदेत राडा पाहायला मिळाला. एका बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. बरं एवढ्यावरच ते शांत झाले नाहीत, तर एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

सेना-भाजप नगरसेवकांमध्ये बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर धावून गेले, कोकणचा पॅटर्नच वेगळाय!
सावंतवाडी नगरपरिषदेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये राडा
Follow us on

सिंधुदुर्ग :  सावंतवाडीच्या नगरपरिषदेत राडा पाहायला मिळाला. एका बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. बरं एवढ्यावरच ते शांत झाले नाहीत, तर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राज्यात शिवसेना भाजपचा सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. पण हा संघर्ष आता अगदी तालुका पातळीवर जाऊन पोहोचलाय. पण ही राडेबाजी, संघर्ष कोकणासाठी नवीन नाहीय.

सेना-भाजप नगरसेवकांमध्ये बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर धावून गेले

जिओने शहरात खोदलेले खड्डे, काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी पालिका सभेत शिवसेना आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधे बाचाबाची होऊन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

शिवसेनेचे नगरसेवक डाॅक्टर जयेंद्र परुळेकर आणि भाजपचे नगरसेवक अॅडव्हकेट परिमल नाईक यांच्यात नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे जोरदार खडाजंगी झाली. यावेळेस जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो आणि नगरसेवक मनोज नाईक यांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र पालिका सभेत झालेला शिवसेना आणि भाजप नगरसेवका मधील राडा चर्चेचा विषय मात्र ठरला आहे.

हे ही वाचा :

Maharashtra MLC Election 2021 : कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात कोण ? भाजपची महत्त्वाची बैठक, महाडिक म्हणतात संधी दिल्यास ताकदीने लढू

बॉम्बे हायकोर्टाकडून ज्ञानदेव वानखेडेंना झटका, कोर्ट म्हणतं, मलिकांचं ट्विट चूक असल्याचं सिद्ध करा !