कोरोनामुळे घर खरेदीचा पॅटर्न बदलला, शहराबाहेर घर खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती

| Updated on: Jun 22, 2021 | 7:38 AM

आता लोक गर्दीच्या ठिकाणी घरे घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे डेव्हलपर्सने देखील शहराबाहेर घरे तयार करण्यास सुरुवात केली आहे. (consumers preferring to buy a home out of city due to corona)

कोरोनामुळे घर खरेदीचा पॅटर्न बदलला, शहराबाहेर घर खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती
घर खरेदीदारांसाठी चांगली बातमी! आता 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार गुंतवणूकीवरील करात सूट
Follow us on

पालघर : कोरोना काळात मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीचे पॅटर्न आता बदलले आहे. आता लोक गर्दीच्या ठिकाणी घरे घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे डेव्हलपर्सने देखील शहराबाहेर घरे तयार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता अनेकजण बाहेर सुरक्षितेसाठी घरे घेण्याचा विचार करत आहे, असे एका प्रॉपर्टी कन्सल्टंट एनरॉकच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. (Many consumers preferring to buy a home out of city due to corona pandemic reveled from survey)

शहरापासून काही अंतरावर घर घेण्यास पसंती

कोरोनानंतर शहराबाहेर घरे घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येतं आहे. तर दुसरीकडे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनने (एमएमआर) मध्ये पनवेल, पालघर, वसई, विरार, बदलापूर, भिवंडी आणि डोंबिवली या शहरांमध्ये 67 टक्के नवीन घरे लाँच करण्यात आली आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात 60 टक्के घर ही या भागांत होती. मुंबईच्या हाकेच्या अंतरावर पालघर जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भाग निसर्ग, समुद्र आणि नद्यांनी नटलेला आहे. हा जिल्हा आदिवासी बहुल असल्याने मुंबईतील नागरिकांनी गर्दी, कोरोना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पालघर, बोईसर, सफाळे, वाडा शहरापासून काही अंतरावर घर घेणं पसंद केलं आहे.

ग्रामीण भागात घरांची उभारणी

कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात घरे खरेदीची पद्धत बदलत आहे. कारण सध्या लोक आरोग्य सुरक्षितेतला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षात जास्तीत जास्त घरांची खरेदी शहरापेक्षा ग्रामीण भागात केली जात आहे. तसेच आता ग्राहक ई-स्कूलिंग, घरातून काम आणि सुरक्षेच्या दृष्टीने घर विकत घेत आहेत. अशा परिस्थितीत विकासक घर खरेदीदारांची मागणी लक्षात घेऊन ग्रामीण भागात घरांची उभारणी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोव्हिडचे थैमान पाहायला मिळत आहे. शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण, त्यात वाढती गर्दी यामुळे अनेक नागरिकांनी घर खरेदी करण्याचा कल ग्रामीण भागाकडे वळवला आहे. सध्या अनेक जण पालघर, बोईसर, डहाणू, सफाळे, वाडा, वसई, विरार या ठिकाणी घर घेत आहे. विशेष म्हणजे ही घर शहरापासून दूर आणि सोयीस्कररित्या परवडणाऱ्या किंमतीत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात विकासकाने उभारलेल्या घरामध्ये राहणं पसंद आणि सुरक्षित वाटत असल्याचे एकंदरीत समोर आलं आहे.

सध्या कुठे, किती घरांचे बांधकाम?

प्रॉपर्टी कन्सल्टंट एनरॉकच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-22 मध्ये पहिल्या सात शहरांमध्ये 1 लाख 49 हजार घरे लाँच करण्यात आली होती. त्यापैकी 58 टक्के घरे शहर हद्दीत सुरू करण्यात आली. तर गेल्या आर्थिक वर्षात ही आकडेवारी 51 टक्के होती. महाराष्ट्राच्या पुणे शहरात नवीन घराच्या लॉंचिंगच्या एकूण हिस्सापैकी 76 टक्के हिस्सा हा सीमावर्ती भागात होता. यामध्ये मुळशी, चाकण, पिरंगट, चिखली आणि इतर भागांचा समावेश आहे. (Many consumers preferring to buy a home out of city due to corona pandemic reveled from survey)

संबंधित बातम्या : 

या 15 बँका स्वीकारणार ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती

कोरोना काळातही मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती; एप्रिल महिन्यात बंपर नोकरभरती

पोस्ट ऑफिसच्या या सुपरहिट योजनेत फक्त 50 हजार करा जमा, पेन्शन स्वरुपात मिळतील 3300 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती