Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 800 नागरिकांचे स्थलांतर, मुलमधील 12 लोकं शेतात अडकलेत

| Updated on: Jul 19, 2022 | 3:09 PM

वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 136 मिमी एवढा सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले.

Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 800 नागरिकांचे स्थलांतर, मुलमधील 12 लोकं शेतात अडकलेत
नद्या अशा दुथळी भरून वाहत आहेत.
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व भद्रावती (Bhadravati) तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. एसडीआरएफची (SDRF) एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी (Wardha River) पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सद्याची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु आज सायंकाळी चार वाजतानंतर प्राणहिता नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सद्या परिस्थिती आटोक्यात असली तरी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. मुल तालुक्यातील 12 लोक शेतात अडकले. त्यांचे बचाव कार्य सुरू आहे. तालुका चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथील 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. SDRF ची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

राज्यात पुरामुळे 289 गावे प्रभावित

वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 136 मिमी एवढा सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. त्यांच्या बचावाकरिता एक एनडीआरएफ टीम व एक एसडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 397 लोकांना 10 निवारा केंदात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यात पुरामुळे 28 जिल्हे व 289 गावे प्रभावित झालीत. 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत 12 हजार 233 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 108 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे. 189 प्राणी दगावले आहेत. पावसामुळे आतापर्यंत 44 घरांचे पूर्णत: तर 1 हजार 368 घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही

कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा 30 जुलैपर्यंत सकाळी 6 वाजतापासून ते सायंकाळी 7 वाजतापर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. सायंकाळी 7 वाजता ते 6 वाजतापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 2 NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा