मोहता टेक्स्टटाईल कायमची बंद, टाळेबंदीने 570 कर्मचाऱ्यांची चूल विझली!

वर्ध्यातील शेकडो कामगारांच्या घरची चूल पेटवणारी मोहता टेक्स्टाईल इंडस्ट्रीला कायमचं टाळे लागलं आहे. येत्या 6 जूनपासून मोहता इंडस्ट्रीज कायमची बंद होणार आहे.

मोहता टेक्स्टटाईल कायमची बंद, टाळेबंदीने 570 कर्मचाऱ्यांची चूल विझली!
Mohota Industries Limited Wardha

वर्धा : कोरोना महामारी आणखी किती संकटं घेऊन येणार आहे असा प्रश्न आहे. कारण वर्ध्यातील शेकडो कामगारांच्या घरची चूल पेटवणारी मोहता टेक्स्टाईल इंडस्ट्रीला (Mohota Industries Limited) कायमचं टाळे लागलं आहे. येत्या 6 जूनपासून मोहता इंडस्ट्रीज कायमची बंद होणार आहे. व्यवस्थापकाने तसा बोर्ड कापड गिरणीच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. त्यामुळे 570 कामगारांवर बेकारीची (Unemployment) कुऱ्हाड कोसळली आहे. (Mohota Industries Limited from wardha shut down permanently management publish notice on board)

हिंगणघाट येथील मोहता इंडस्ट्रीज आरएसआर स्पिनिंग आणि प्रोसेलिंग कापड गिरणी म्हणून ओळखली जाते. आता कंपनीच्या व्यवस्थापकाने दिनांक 22 मे 2021 रोजी कापड गिरणीच्या प्रवेशद्वारावर येत्या 6 जून 2021 पासून या कापड गिरणीमध्ये कायमची टाळेबंदी लावण्यात येत आहे अशा सूचनेचा लिखित आदेश लावला. त्यामुळे कामगारांमध्ये खळबळ माजली आहे.

570 कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

या कापड गिरणीमध्ये एकूण 570 कामगार होते. त्यातील प्रोसेसिंग युनिट दीड वर्षापासून बंद असल्याने 210 कामगारांना लेऑफ देऊन मॅनेजमेंट या कामगारांना अर्धे वेतन देत होतं. तर इतर 360 कामगार स्पिनिंग विभागात तीन शिफ्टमध्ये काम करीत होते. हा विभाग सुध्दा जॉब वर्कवर चालत होता. पहिले पंजाबमधील नंतर मुंबई येथील टेक्स्टाईल कंपनी जॉब वर्क करीत होती.

 कर्जाचा वाढता बोजा

दरम्यान, बोर्डावर लावलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की, कापड गिरणी गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चालत आहे. मार्च 2020 या आर्थिक वर्षात हा तोटा वाढवून 34 कोटी 20 लाखावर पोहोचला. यामध्ये डिसेंबर 2020 मध्ये 13 कोटी रुपयांची वाढ झाली. सध्यस्थितीत कापड गिरणीवर 108 कोटी रूपयांचे एकूण देणे असल्याचे सांगण्यात आले. गिरणी चालविण्यासाठी विविध बँकामधून कर्ज घेतले होते.

परंतु, गिरणीची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याने गेल्या 2019 पासून गिरणीने राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज आणि हप्ते दोन्ही थकविले आहे. एका बँकेकडून दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी कापड गिरणीचा संचालक बोर्ड भंग करून त्याजागी प्रशासकाची नियुक्ती करावी ही कारवाई सुरू केली होती. तसेच इतर बँकेने सुध्दा वसुलीचा तगादा लावला होता. विद्युत महावितरण कंपनीचे एक कोटी 75 लाख रुपयांचे बिल थकित असल्याने महावितरणकडून गिरणीचा विद्युत पुरवठा सुध्दा पंधरा दिवसा अगोदर बंद करण्यात आला.

अखेर नोटीस लागली

7 मेपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केले. तेव्हापासून कापड गिरणी बंद होती. कापड गिरणीची आर्थिक व्यवस्था चारी बाजूने नाजूक झाली होती. अशावेळी मॅनेजमेंटकडून 22 मे शनिवारी सायंकाळी गिरणीच्या प्रवेशद्वाराच्या बोर्डवर नोटीस लावली. कापड गिरणीत येत्या 6 जून 2021 पासून कायमची टाळेबंदी करण्यात येत आहे, असं यामध्ये म्हटलं आहे.

अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असून, मिल बंद केल्यास आंदोलन करणार असल्याची घोषणा माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या 

VIDEO: आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती

(Mohota Industries Limited from wardha shut down permanently management publish notice on board)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI