Nanded | माळाकोळी येथील आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा, वैद्यकीय कर्मचारी जागेवर नसल्याच्या तक्रारी…

| Updated on: Aug 29, 2022 | 10:31 AM

नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी इथले आरोग्य केंद्र रुग्णांसाठी गैरसोयीचे बनलंय. कुटूंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसलाय. आरोग्य केंद्रात पाणी, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. इतकेच नाही तर आरोग्य केंद्रात अस्वच्छता बघायला मिळते.

Nanded | माळाकोळी येथील आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा, वैद्यकीय कर्मचारी जागेवर नसल्याच्या तक्रारी...
Follow us on

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्हातील लोहा तालुक्याच्या शेजारी असलेल्या माळाकोळी येथील आरोग्य केंद्राचे तीन तेरा वाजल्याचे चित्र बघायला मिळतंय. आरोग्य केंद्रात उपचार (Treatment) करण्यासाठी आलेल्या रूग्णांचे हाल होताना दिसतायंत. इतकेच नाही तर रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांना खासगी रूग्णालयात जाण्याच्या सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिला जात असल्याची धक्क्कादायक (Shocking) बाब पुढे आलीयं. आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेवर येत नसल्याने रूग्णांना ताटकळत बसावे लागते. मात्र, तक्रार नेमकी कोणाकडे करावी हाच मोठा प्रश्न रूग्णांसमोर उभा आहे.

कुटूंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना मोठा फटका

नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी इथले आरोग्य केंद्र रुग्णांसाठी गैरसोयीचे बनलंय. कुटूंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसलाय. आरोग्य केंद्रात पाणी, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. इतकेच नाही तर आरोग्य केंद्रात अस्वच्छता बघायला मिळते. बरेच दिवस इथे साफसफाई देखील केली जात नसल्याचे घाणीचे साम्राज्य बघायला मिळते. रूग्णांना साधे पिण्यासाठी इथे पिण्याचे पाणी देखील उपब्लध नाहीयं.

हे सुद्धा वाचा

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय कर्मचारी जागेवर नसल्याच्या तक्रारींचा पाऊस

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय कर्मचारी जागेवर नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या आहेत. आरोग्य केंद्रामध्ये सकाळी वेळेवर कधीच आरोग्य कर्मचारी येत नसल्याची तक्रार रूग्णांनी केलीयं. माळाकोळी हे लोहा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून इथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते, त्यामुळे आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी रुगणांच्या नातेवाईकांनी केलीय.