लग्नाला जाताना वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात तब्बल 37 जण जखमी, एकाचा जागीच मृत्यू

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना मुखेड तालुक्यात घडली असून यामध्ये एकून 37 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

लग्नाला जाताना वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात तब्बल 37 जण जखमी, एकाचा जागीच मृत्यू
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 4:37 PM

नांदेड : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना मुखेड तालुक्यात घडली असून यामध्ये एकून 37 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Nanded truck carrying people for marriage ceremony overturned 37 people injured)

अपघातात 37 जण जखमी, एक ठार

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील उदगीर तालुक्यातील हाळी गावातील लग्नाचे हे वऱ्हाड बिलोली तालुक्यात जात होते. यावेळी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आल्यानंतर भरधाव वेगात असणारा हा ट्रक एका वळणावर आला. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकचा मोठा अपघात झाला. या अपघातात एकूण 37 जण जखमी झाले असून एक जण जागीच ठार झाला आहे. तर जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्व जखमींपैकी 33 जणांवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चार जणांची प्रकृती गंभीर

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रकमधील एकूण 37 जण जखमी झालेयत. या 37 जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर असलेल्या या रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. जखमींत 29 महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.

हिंगोलीमध्ये विचित्र अपघात, चार जणांचा मृत्यू

हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. सध्या हिंगोलीत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. सेनगाव जिंतूर रस्त्यावरही असेच काम सुरु होते. त्यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने रस्त्यावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साठले होते. त्यामुळे कार खड्ड्यात पडल्यानंतर गाडी लगेच लॉक झाली. त्यानंतर पाण्यात बुडून गाडीतील चारही जणांचा मृत्यू झाला.

रविवारी रात्री हा प्रकार घडला. अंधारात पाण्याने भरलेला खड्डा चालकाच्या नजरेला पडला नाही. त्यामुळे कार वेगाने जाऊन खड्ड्यात आदळली. यानंतर गाडीतील चौघांनाही सावरण्यासाठी वेळही मिळाला नाही. खड्डा पाण्याने भरला असल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन चौघांचाही मृत्यू झाला.

इतर बातम्या :

नागपूर रेल्वे स्थानकावर काळ्या रंगाची बेवारस बॅग, खोलून पाहिलं तर निघालं लाखोंचं ड्रग्ज, तिघांना बेड्या

62 वर्षीय भाजी विक्रेतीची बलात्कारानंतर हत्या, 30 वर्षीय आरोपीला अटक

VIDEO | गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडांची पुण्यात पोलिसांकडून धिंड?

(Nanded truck carrying people for marriage ceremony overturned 37 people injured)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.