62 वर्षीय भाजी विक्रेतीची बलात्कारानंतर हत्या, 30 वर्षीय आरोपीला अटक

महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. तर तिच्या पोटात 25 वेळा चाकू खुपसण्यात आला होता.

62 वर्षीय भाजी विक्रेतीची बलात्कारानंतर हत्या, 30 वर्षीय आरोपीला अटक
आरोपी विपीन डेढा

नवी दिल्ली : 62 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार करुन हत्या (old lady rape and murder) करणाऱ्या तरुणाला पूर्व दिल्ली पोलिसांनी (East Delhi Police) अटक केली आहे. 30 वर्षीय आरोपी विपीन डेढा याला घटनेच्या 24 तासांतच न्यू अशोक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पीडित महिला आरोपीच्या परिचयातील होती. त्यामुळे बलात्काराबाबत वाच्यता करण्याच्या भीतीनेच विपीनने वृद्धेची चाकूने भोसकून हत्या केली. (Delhi Crime Man arrested for killing 62 years old vegetable seller old lady)

आरोपी आणि पीडिता परिचयातील

आरोपी विपीन डेढा मयत महिलेच्या घराजवळ दल्लुपुरा भागात राहत होता. तो नेहमीच महिलेकडे भाजीच्या दुकानाजवळ येत असे. पीडित महिला बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील रहिवासी होती. गेल्या काही दिवसांपासून ती दिल्लीत भाजी विक्री करत होती. तर दल्लूपुरा भागातील पीपल चौकात वास्तव्याला होती.

पोटात 25 वेळा चाकू खुपसला

13 जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास 62 वर्षीय महिलेला धर्मशीला रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. धारदार शस्त्राने भोसकून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. तर तिच्या पोटात 25 वेळा चाकू खुपसण्यात आला होता.

सीसीटीव्ही फूटेजमुळे ओळख

न्यू अशोक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यावेळी एक युवक संशयास्पदरित्या परिसरात फिरत असल्याचं आढळलं. स्थानिक बीट कॉन्स्टेबलच्या मदतीने आरोपी युवकाची ओळख पटवण्यात आली. 24 तासांतच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कसून चौकशी केल्यावर आरोपीने गुन्हा कबूल केला. हत्येसाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी घटनास्थळावरुन जप्त केला.

…म्हणून हत्या केल्याची कबुली

वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची कबुली 30 वर्षीय आरोपी विपीन डेढाने दिली. महिला ओळखीची असल्यामुळे ती बलात्काराची तक्रार करेल आणि आपण पकडले जाऊ, या भीतीने विपीनने तिची चाकूने भोसकून हत्या केली होती. मात्र आता या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचं आरोपी म्हणतो.

पुण्यात वृद्धेची हत्या करुन अतिप्रसंग

पुणे जिल्ह्यात चाकण जवळील कुरकुंडी भागात वृद्धेची हत्या करुन अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या महिन्यात उघडकीस आला होता. 71 वर्षीय महिला घरात एकटीच असताना 52 वर्षीय आरोपी अनिल वाघमारे तिच्या घरात घुसला. अनिलने वृद्धेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्या डोक्यात घरात असलेल्या चुलीच्या समोरील लोखंडी फुकारीने मारले. गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. वृद्धा मृत्युमुखी पडल्यावर आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला.

संबंधित बातम्या :

वृद्ध महिलेची हत्या करुन अतिप्रसंग, पुण्यात घृणास्पद प्रकार, आरोपी चार तासात जेरबंद

39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार

(Delhi Crime Man arrested for killing 62 years old vegetable seller old lady)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI