Vijay Wadettiwar : राज्यातील ओबीसींची संख्या 37.26 टक्के!, विजय वडेट्टीवार म्हणतात, बांठिया आयोगाचा अहवाल फेटाळा

| Updated on: Jul 15, 2022 | 8:10 PM

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टी आणि पुराची भीषण स्थिती आहे. राज्यात आतापर्यंत पुरात 100 जणांचा जीव केलाय. शेकडो घरांची पडझड झालीय.

Vijay Wadettiwar : राज्यातील ओबीसींची संख्या 37.26 टक्के!, विजय वडेट्टीवार म्हणतात, बांठिया आयोगाचा अहवाल फेटाळा
विजय वडेट्टीवार म्हणतात, बांठिया आयोगाचा अहवाल फेटाळा
Image Credit source: t v 9
Follow us on

चंद्रपूर : ओबीसी घटकाची राज्यातील लोकसंख्या 37.26 टक्के असल्याचा बांठिया आयोगाचा अहवाल आहे. हा अहवाल तातडीने फेटाळण्याची मागणी ओबीसी नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राजकीय आरक्षणासाठी (Reservation) करण्यात येणारा हा खटाटोप शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणाच्या मुळावर जाणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात 52 टक्के ओबीसी असल्याचे लक्षात आणून देत आरक्षणाची तरतूद केली होती. मात्र आयोगाचा ताजा निष्कर्ष म्हणजे ओबीसींना संपवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही वर्षात ओबीसी घटकांमध्ये 150 हून अधिक जाती समाविष्ट झाल्या आहेत. त्यांची लोकसंख्या (Population) कमी कशी होईल, असा सवाल त्यांनी विचारला. ओबीसींना खड्ड्यात घालणाऱ्या या निर्णयाविरोधात आंदोलक भूमिका घेण्यासाठी सोमवारी मुंबईत (Mumbai) बैठक आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ओबीसी समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना केले आहे.

गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टी आणि पुराची भीषण स्थिती आहे. राज्यात आतापर्यंत पुरात 100 जणांचा जीव केलाय. शेकडो घरांची पडझड झालीय. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक गेलंय. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. राज्य सरकारने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत. राज्य सरकारने पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागाचा दौरा त्यांनी केला. यावेळी ते बोलत होते. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात भीषण पूरपरिस्थिती आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणखी कुमक देण्याची गरज असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

पूरग्रस्त भागाची केली पाहणी

विजय वडेट्टीवार म्हणाले, गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात धो-धो पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर शहरातील इराई नदी, दाताळा, रहमतनगर, नगीनाबाग, पठाणपुरा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, दादमहल, जोडदेऊळ वार्ड, पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देत नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे करणार असे आश्वासन दिले. शहरातील सर्व काँग्रेसचे सेलचे पदाधिकारी अतिशय तातडीने मदतकार्य पूरवत आहेत. काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे, अशी ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिली. यावेळी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष , युवक काँग्रेस पदाधिकारी तथा सर्व सेल पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा