Border 2 : त्यापेक्षा स्वत:च्या गेमवर लक्ष दे…संदेसे आते हैं गाणं गाणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला लोकांनी सुनावलं, VIDEO
Border 2 : सध्या सोशल मीडियावर बॉर्डर 2 चित्रपटाची क्रेझ दिसून येतेय. चित्रपटाशी संबंधित अनेक रील्स व्हायरल होत आहेत. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने सुद्धा असाच प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला सुनावल. त्यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष दे असं म्हटलं.

नुकताच बॉर्डर 2 चित्रपट रिलीज झाला. या फिल्मने फक्त बॉक्स ऑफिसवरच धमाका केला नाही, तर देशभरात या चित्रपटाचा फीवर पसरलाय. 23 जानेवारी 2026 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटावर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी स्टारर या चित्रपटाने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. सोशल मीडियावर ते पहायला मिळतय. आता एक व्हिडिओ आलाय. त्यात टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जैस्वाल बॉर्डर 2 च्या फीवर मध्ये असल्याचं दिसतय. अनुराग सिंह यांनी बॉर्डर 2 च डायरेक्शन केलय. 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांची स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
1997 साली रिलीज झालेल्या ओरिजनल चित्रपटाचा हा सीक्वल आहे. काही गाणी जु्न्या चित्रपटातून घेण्यात आली आहेत. नवीन वर्जन लोकांना आवडलय. नुकतच टीम इंडियाच क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘संदेसे आते हैं’ गाताना दिसला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
माझ्या डोक्यातून हे गाणं जातच नाहीय
हा व्हिडिओ स्वत: जैस्वालने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलाय. त्यात तो क्रीम किंवा लोशन लावून फोन समोर गाताना दिसतो. व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिलय ‘काय गाण आहे, माझ्या डोक्यातून हे गाणं जातच नाहीय. मला हे गाणं खूप आवडतं’. हा व्हिडिओ पाहून यशस्वीला बॉर्डर 2 च्या गाण्यांनी वेड लावलय असं लोक म्हणतायत. यशस्वीच्या फॅन्सना हा व्हिडिओ आवडलाय. काही लोकांनी या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Yashasvi Jaiswal bro singing ain’t your domain please stick to the cricket. 😭😭pic.twitter.com/Ar0b5XCwHI
— Dhillon (@sehajdhillon_) January 25, 2026
गाणं तुझं क्षेत्र नाही
यशस्वी जैस्वलाने क्रिकेटशिवाय गाण्याचा प्रयत्न करु नये असं काहींनी म्हटलं आहे. काहींनी त्याच्या सिंगिंग स्किल्सवर ट्रोलिंग केलय. एका युजरने म्हटलय, यशस्वी भाई, गाणं तुझं क्षेत्र नाही, खेळावर लक्ष दे. दुसऱ्यांने मीम्स शेअर करताना म्हटलय की, बसं गाणं सोड आता भाई. या फिल्मने तीन दिवसात जबरदस्त कमाई केलीय.
