अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस दिली. यानंतर मनसैनिक पवार खचल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ जारी करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय. “तुमचा मनसैनिक पूर्णपणे खचलाय. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढेही झुकणार नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. आता याला तुम्हीच उत्तर द्या,” अशी मागणी अविनाश पवार यांनी केलीय. तसेच मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाल्यास त्याला आमदार निलेश लंके जबाबदार असतील, असाही इशारा दिलाय (Parner MNS Activist emotional video to Raj Thackeray over 1 crore defamation notice by MLA Nilesh Lanke).
“राज साहेबांना सांगा तुमचा मनसैनिक पूर्ण खचलाय”, निलेश लंकेच्या 1 कोटीच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर पारनेरच्या मनसे पदाधिकाऱ्याचं थेट राज ठाकरेंना आवाहन.@RajThackeray @mnsadhikrut @NCPspeaks #MNS #NCP #RajThackeray #NileshLanke #AvinashPawar #Ahmednagar #DefamationCase pic.twitter.com/OygvFGVfwe
— Pravin Sindhu ??✊ (@PravinSindhu) May 30, 2021
अब्रुनुकसानीची 1 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी थेट आमदार निलेश लंके यांच्यावर फोन करुन त्यांना आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. तसेच राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. त्यामुळे आता अहमदनगरच्या या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या स्तरावर उमटण्याची शक्यता आहे.
आपल्यावरील आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. 11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला.”
“पारनेरचे तहसिलदार नोटीस काढतात, पोलीस नोटीस देतात. त्यांच्याकडे चकरा मारत सहन करत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देण्यात आल्या. आता मला वकिलांमार्फत नोटीस देत 15 दिवसात 1 कोटी 5 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आलीय. तसं नाही केलं तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.
अविनाश पवार म्हणाले, “माझी चूक काय आहे. त्यांनी मला आईवरुन शिव्या दिल्या, माझ्या पक्षाला भंगार म्हणाले. चुका यांनी करायच्या आणि पैसे माझ्याकडे मागायचे. मी त्याच मतदारसंघातील माणूस आहे. आमदारांना हजार लोक मानत असतील तर मला 10-20 तर मानत असतील की नाही. या आमदाराला मनसैनिकांनीच मतदान केलंय. त्याच मनसैनिकांबद्दल हे असं वागत असतील तर हे आमदारांना शोभतं का? माझा आता कुणावरच विश्वास राहिला नाही. सुपा पोलीस स्टेशन, पारनेर पोलीस आणि तहसीलदार यांना मी लेखी निवेदन दिलंय. त्यांनी माझी कोणतीही चौकशी केली नाही.”
“आमदार निलेश लंकेंपासून मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. उद्या माझं काही बरंवाईट झालं तर याला हाच व्यक्ती जबाबदार राहिल. हेच आमदार चुका करुन माझी बदनामी करत आहेत. माझी राज साहेबांना विनंती आहे. हा सच्चा कार्यकर्ता आहे, कुणापुढे झुकणारा नाही. आमच्यावर तुमचे संस्कार आहेत. मी पूर्ण खचलेलो आहे, आता याला उत्तर तुम्हीच द्या. माझे आई वडील वयस्कर आहेत. त्यांना टेंशन घेऊन काही झालं, तर याला पूर्णपणे निलेश लंके जबाबदार असतील. माझी कळकळीची विनंती आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.
बनावट क्लिप तयार करुन बदनामी केल्याचा आरोप, आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटीची नोटीस@NCPspeaks @mnsadhikrut #NCP #NileshLanke #MNS #AvinashPawar #Ahmednagar #अहमदनगर pic.twitter.com/E282TfS66I
— Pravin Sindhu ??✊ (@PravinSindhu) May 30, 2021
निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, “पारनेरचे लोकप्रतिनिदी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.”
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Parner MNS Activist emotional video to Raj Thackeray over 1 crore defamation notice by MLA Nilesh Lanke