Ahmadnagar Police : श्रीरामपूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, दुर्लक्ष केल्याने पोलीस निरीक्षक संजय सानप निलंबित

| Updated on: Aug 20, 2022 | 3:12 PM

पोलीस चौकशीत दोषी आढळल्याने पोलीस निरीक्षक सानप यांना निलंबित करण्यात आलंय. याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी यांना निलंबित करण्यात आले होते.

Ahmadnagar Police : श्रीरामपूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, दुर्लक्ष केल्याने पोलीस निरीक्षक संजय सानप निलंबित
दुर्लक्ष केल्याने पोलीस निरीक्षक संजय सानप निलंबित
Follow us on

अहमदनगर : श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. तिला बळजबरी धर्मांतर करायला भाग पाडणार्‍या मुल्ला कटर या कुख्यात गुन्हेगाराला पाठीशी पोलीस होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप (Sanjay Sanap) यांना निलंबित करण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) मनोज पाटील (Manoj Patil) यांनी पोलीस निरीक्षक सानप यांच्याविरुध्द ही निलंबनाची कारवाई केलीय. या प्रकरणी विविध संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला. त्यानंतर अत्याचार प्रकरणी आरोपी मुल्ला कटर यास अटक करून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी निलंबित

पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अत्याचारित मुलगी नऊ महिन्यांची गर्भवती राहिली. मुलीचं आयुष्य उद्धवस्त झाल्याने पोलीस निरीक्षक सानप यांना बडतर्फ करण्यात आलं. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी आणि हिंदू संघटनांनी केली होती. पोलीस चौकशीत दोषी आढळल्याने पोलीस निरीक्षक सानप यांना निलंबित करण्यात आलंय. याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी यांना निलंबित करण्यात आले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिचे धर्मांतर करण्यात आले. तीन वर्षे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघांविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करत आहेत. मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पोलीस निरीक्षक संजय सानप हे मतद करत असल्याचा आरोपी तक्रारदार महिलेनं केला होता. तिच्या तक्रारीची दखल श्रीरामपूर पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळं ती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सानप हे दोषी आढळल्यानं त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा