Video Bhandara accident : भंडाऱ्यात विसर्जनासाठी वैनगंगा नदीत गेले, नाव पलटल्यानं 6 जण बुडाले, लगेच मदत मिळाल्याने वाचले प्राण

पट्टीचे पोहणारे लगेत नदीत उतरले. दुसऱ्या नावाड्यानं नाव त्यांच्या मदतीला नेली. त्यामुळं ते सुखरुप बाहेर पडले. पण, हा थरार काहींना कॅमेऱ्यात कैद केला. या प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video Bhandara accident : भंडाऱ्यात विसर्जनासाठी वैनगंगा नदीत गेले, नाव पलटल्यानं 6 जण बुडाले, लगेच मदत मिळाल्याने वाचले प्राण
भंडाऱ्यात विसर्जनासाठी वैनगंगा नदीत गेले, नाव पलटल्यानं 6 जण बुडालेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 2:38 PM

भंडारा : वैनगंगा नदी तशी जीवनदायीनी पण केव्हा कोपेल काही सांगता येत नाही. गोसेखुर्द धरण झाल्यामुळं बॅकवॉटर 20 ते 25 किलोमीटरपर्यंत आहे. कामानिमित्त लोकांना एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जावं लागते. अशावेळी नावेचा उपयोग करतात. काल कृष्ण जन्माष्ठनिमित्त कहय्याचं विसर्जन सुरू होते. नदी गावालगत असल्यानं लोक विसर्जन करायला गेले. नावेत सहा जण बसले होते. या कहैय्या (kahaiyya) विसर्जन करून आले. नाव किनारी पोहचली असं त्यांना वाटलं. पाय टेकले. पाहतात तर काय ते बुडायला लागले. बाजूची नाव लगेच मदतीला धावली. पोहणाऱ्यांनी नदीत सूर धरला. बुडताणाऱ्यांना लगेच नावेचा आधार देऊन बाहेर काढण्यात आले. त्यामुळं सहा जणांचे प्राण वाचले (saved life). ही घटना खमारी (khamari buti) येथे घडली.

पाहा व्हिडीओ

नेमकं काय घडलं

एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नावेचा उपयोग केला होता. काल कहैय्या विसर्जन होतं. विसर्जनासाठी सहा जण नावेत बसले. विसर्जन करून परत येत होते. तेवढ्यात तोल गेला. नावेतून सहाही जण खाली पडले. गटांगळ्या खाऊ लागले. किनाऱ्यावर काही लोकं होते. पट्टीचे पोहणारे लगेत नदीत उतरले. दुसऱ्या नावाड्यानं नाव त्यांच्या मदतीला नेली. त्यामुळं ते सुखरुप बाहेर पडले. पण, हा थरार काहींना कॅमेऱ्यात कैद केला. या प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2009 च्या दुर्घटनेची आठवण

खमारी बुटी याच भागात 2009 मध्ये मोठी दुर्घटना घडली होती. रोवणीसाठी 34 महिला नदी ओलांडून गेल्या होत्या. तेव्हा नदीला पूर नव्हता. पण, क्षमतेपेक्षा जास्त जण बसले असल्यानं नाव बुडाली. महिला गटांगळ्या खाऊ लागल्या. ज्या ठिकाणी नाव बुडाली तिथं मोठा खड्डा होता. त्यात बुडून 34 महिलांचा बळी गेला होता. ही घटना 13 वर्षांपूर्वीची असली तरी त्या घटनेची आठवण आज झाली. कारण त्यावेळी 34 महिलांचा बळी गेला होता. ही घटनासुद्धा याच भागात घडली होती.

Non Stop LIVE Update
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.