Gadchiroli Murder : प्रियकरासोबत लग्नाला आईचा विरोध, पोटच्या पोरीनच जन्मदातीला संपवलं, गडचिरोलीत नक्की काय घडलं?

ऊर्मिला व तिचा प्रियकर रुपेश यांनी ऊर्मिलाची आई निर्मला हिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आता मृतदेह कुठं फेकायचा यासाठी ते सुरक्षित जागा शोधत होते. तेवढ्यात पोलिसांची त्यांच्यावर नजर पडली. संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Gadchiroli Murder : प्रियकरासोबत लग्नाला आईचा विरोध, पोटच्या पोरीनच जन्मदातीला संपवलं, गडचिरोलीत नक्की काय घडलं?
मुलीने प्रियकराच्या मदतीने आईलाच संपविले, गडचिरोलीतील थरार
इरफान मोहम्मद

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 20, 2022 | 7:20 AM

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एक थरारक हत्येची ( thrill in Gadchiroli) घटना समोर आली. मुलीचे प्रियकरासोबत सूत जुळले. तिच्या आईचा प्रियकरासोबतच्या लग्नाला विरोध होता. दुसरं म्हणजे अनुकंपा तत्वावर मुलीला नोकरी मिळणार होती. ती नोकरी स्वीकारू नको, असं आईचं म्हणण होतं. यावरून मुलीचे आईसोबत वाद होत होते. मुलीने प्रियकराच्या मदतीनं आईची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी तीनं प्रियकराची (boyfriend‘) मदत घेतली. हत्या केल्यानंतर आईचा मृतदेह कुठं फेकायचा. यासाठी ते फिरत होते. तेवढ्यात पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. संशयित म्हणून अटक करण्यात आली. तेव्हा हे प्रकरण समोर आले. या घटनेनं गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा हादरला. मुलीनं आपल्या आईची हत्या करण्यापर्यंत विचार कसा केला असेल. एवढी निर्दयी ती कशी झाली असेल, असा प्रश्न या घटनेनं निर्माण झाला. आता ती आणि तिचा प्रियकर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

वडिलांच्या जागेवर मिळणार होती नोकरी

उर्मिला असं या निर्दयी मुलीचं नाव आहे. उर्मिलाचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. वीस वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती. पण नोकरीसाठी जन्मदात्या आईनेच विरोध केला. त्यामुळं आईची हत्या केल्याची कबुली आता अटक झाल्यानंतर उर्मिलानं दिली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील तहसील कार्यालय जवळच्या परिसरात राहत होते. निर्मला आत्राम यांची त्यांच्या घरात गळा आवळून मुलीनंच हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी उर्मिला चंद्रकांत आत्राम व तिचा प्रियकर रुपेश येंगदुलवार या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

मृतदेह घेऊ रात्री फिरत होते

ऊर्मिला व तिचा प्रियकर रुपेश यांनी ऊर्मिलाची आई निर्मला हिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आता मृतदेह कुठं फेकायचा यासाठी ते सुरक्षित जागा शोधत होते. तेवढ्यात पोलिसांची त्यांच्यावर नजर पडली. संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ऊर्मिला व तिच्या प्रियकरानं गुन्हा कबूल केला. प्रथमदर्शनी गळा दाबून ही हत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. यामागे आणखी काही कारण आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. पण, या घटनेनं गडचिरोलीतील अहेरी कार्यालय परिसर हादरले.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें