तो माझा आवाज नाही,ऑडिओ क्लिपची चौकशी करा; अनिल परब, मिलिंद नार्वेकरांचं नाव तक्रारीत नव्हतं, प्रसाद कर्वेंनी यादीच दाखवली

| Updated on: Oct 03, 2021 | 11:14 AM

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणातील प्रसाद कर्वे यांच्याशी टीव्ही 9 मराठीनं संपर्क साधून त्यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी कुठली ही माहिती किरीट सोमय्यांना पुरवली नाही, किरीट सोमय्या आणि माझा संवाद नाही, अशी भूमिका प्रसाद कर्वे यांनी मांडली आहे.

तो माझा आवाज नाही,ऑडिओ क्लिपची चौकशी करा; अनिल परब, मिलिंद नार्वेकरांचं नाव तक्रारीत नव्हतं, प्रसाद कर्वेंनी यादीच दाखवली
प्रसाद कर्वे
Follow us on

रत्नागिरी: शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणातील प्रसाद कर्वे यांच्याशी टीव्ही 9 मराठीनं संपर्क साधून त्यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी कुठली ही माहिती किरीट सोमय्यांना पुरवली नाही, किरीट सोमय्या आणि माझा संवाद नाही, अशी भूमिका प्रसाद कर्वे यांनी मांडली आहे. किरीट सोमय्यां यांनीच महावितण आणि प्रांत कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता, असं कर्वे म्हणाले. तर ऑडिओ क्लिप बेकायदेशीरपणे बाहेर काढल्यात, असं मत देखील प्रसाद कर्वे यांनी मांडलं आहे.

वैभव खेडेकर यांचे वैफल्यग्रस्ततेमुळे आरोप

वैभव खेडेकर यांनी वैफल्यग्रस्ततेमुळे आरोप केले आहेत. मी रामदास कदम यांना 30 वर्ष ओळखतोय. मुरुड, लाडघर इथल्या सीआरझेडमधील बीनशेती परवागी दिल्या त्या विरोधात माझी तक्रार होती. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांनी दिलेल्या परवागी संदर्भात आरटीआय मध्ये अर्ज दाखल केला होता. 33 जणांविरोधात तक्रारीचा अर्ज केला होता त्यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली नव्हती, असं प्रसाद कर्वे म्हणाले आहेत. प्रसाद कर्वे यांनी थेट तक्रार केलेला अर्ज टीव्ही 9 मराठी समोर सादर केला आहे.

रामदास कदम यांनी कुणाच्या विरोधात तक्रार करू नको असं सांगितल्याची माहिती प्रसाद कर्वे यांनी दिली. सीआरझेडमध्ये अर्ज केल्यास लोकांना त्रास होईल. त्यामुळे मी कुणाला माहिती दिली नाही, त्यानंतर तक्रार देखील केली नाही, अशी माहिती प्रसाद कर्वे यांनी दिली.

ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही

माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग नाही, मी कुणाचे रेकॉर्डिंग ठेवत नाही, ऑडिओ क्लिप संदर्भातील आवाज माझा नाही, असं प्रसाद कर्वे म्हणाले. ऑडिओ क्लिपची तपासणी करावी, मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असं प्रसाद कर्वे म्हणाले आहेत. किरिट सोमय्या यांचा माझ्याकडे नंबर नाही, मी कशी किरिट सोमय्या यांच्यांशी बोललेलो नाही. ज्यांनी क्लिप काढल्या त्यांनी चौकशी करावी, आवाजाची चौकशी करावी. माहितीच्या अधिकारात मी पुरावे गोळा केलेत. महावितरण आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे किरीट सोमय्या यांनी अर्ज केलाय.

मिलिंद नार्वेकर यांचे आईचे आजोळ दापोलीत, त्यांचे आमचे संबध चांगले आहेत.ऑडिओ क्लिप पूर्ण खोट्या आहेत. सोमय्या यांनी ही माहिती कुठून घेतली हे मी शोधून काढतोय, असं प्रसाद कर्वे म्हणाले. रामदास कदम यांचा पीए मी कधीच नव्हतो, माझ्या फोनवर असं बोलणं झालेलं नाही, असही कर्वे यांनी म्हटलंय.

इतर बातम्या:

रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद आहे: देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा सेना खासदाराला विसर, म्हणाले, ‘मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब!’

Prasad Karve said viral audio clip should be investigated and he did not mention names of Anil Parab Milind Narvekar in complaint