VIDEO | कोकणातील धबधब्याचे अंगावर काटा आणणारे रुप, धूतपापेश्वर धबाधबा प्रवाहित

राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध धूतपापेश्वर धबाधबा देखील या पावसामुळे प्रवाहित झाला आहे. सध्या हा धबधबा ओसंडून वाहताना दिसत आहे. (Rajapur Dhootapapeshwar Waterfall Konkan heavy rainfall)

VIDEO | कोकणातील धबधब्याचे अंगावर काटा आणणारे रुप, धूतपापेश्वर धबाधबा प्रवाहित
Dhutpapeshwar Waterfall
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 3:19 PM

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसात कोकणात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीसह कोकणातील सर्वच धबधबे प्रवाहित झाले आहे. राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध धूतपापेश्वर धबाधबा देखील या पावसामुळे प्रवाहित झाला आहे. सध्या हा धबधबा ओसंडून वाहताना दिसत आहे. (Rajapur Dhootapapeshwar Waterfall Konkan heavy rainfall)

धबधब्याचे रुप मोबाईल कॅमेऱ्यात कैद

धुतपापेश्वरचा धबधबा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असणारा पाण्याचा प्रवाह अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. तसेच या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असू शकतो याचा अंदाजही आपल्याला लावता येत आहे. लाल रंगाच्या खळाळणारा धबधब्याचे रुप मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

राजापूर तालुक्यातील काही प्रसिद्ध अशा ठिकाणांपैकी धूतपापेश्वर हे एक आहे. या ठिकाणी दत्त आणि शंकराचं मंदिर आहे. त्यामुळे भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा मिलाफ आपल्याला इथे पाहायला मिळतो. (Rajapur Dhootapapeshwar Waterfall Konkan heavy rainfall)

संबंधित बातम्या : 

लातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात येणार, कृषी सचिव-अमित देशमुख यांच्या बैठकीत चर्चा

… तेव्हाच पेरणीला सुरुवात करा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला