Rakshabandhan | देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत रक्षाबंधन, नगरच्या युवा चेतना फाउंडेशनचा समाजासमोर आदर्श

| Updated on: Aug 22, 2021 | 12:38 PM

युवा चेतना फाउंडेशनच्या भावांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर दिसून आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांकडून राखी बांधून घेऊन एक वेगळा आदर्श युवा चेतना फाउंडेशनने समाजासमोर ठेवलाय.

Rakshabandhan | देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत रक्षाबंधन, नगरच्या युवा चेतना फाउंडेशनचा समाजासमोर आदर्श
Follow us on

अहमदनगर : जिल्ह्यात युवा चेतना फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केलाय. समाजातून उपेक्षीत असलेल्या देहविक्री करणार्या महिलांकडून राखी बांधून घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केलाय.

देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या प्रिय आणि लाडक्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेताना तिच्या सुख-समाधानाची कामना करत तिच्या प्रत्येक कठीण प्रसंगात मागे उभी राहण्याचा विश्वास आज प्रत्येक भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला देत असतो. पण समाजाचाच स्त्री रूपातील पण लालबत्ती भागात वास्तव्य करणाऱ्या घटकाला कसला आलाय भाऊ ?? समाज देह विक्री करणाऱ्या स्त्रियांना नेहमीच वाईट नजरेने पाहत आलाय. मात्र आज याच बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाची कमी वाटू नये आणि तुमच्या पाठिशीही कोणी तरी आहे, हा विश्वास देण्यासाठीचा प्रयत्न अहमदनगरच्या युवा चेतना फाउंडेशनच्या भावांनी केला.

नगरच्या लाल बत्ती भागात जाऊन या भावांनी राखी बांधून घेत समजा समोर एक आदर्श ठेवला. समाज जरी या महिलांपासून मानसिक रित्या दूर असला तरी आम्ही नेहमीच लालबत्ती भागातील बहिणींच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

युवा चेतना फाउंडेशनचा समाजासमोर आदर्श

युवा चेतना फाउंडेशनच्या भावांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर दिसून आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या महिलांकडून राखी बांधून घेऊन एक वेगळा आदर्श युवा चेतना फाउंडेशनने समाजासमोर ठेवलाय.

हे ही वाचा :

Rakshabhandhan | गडचिरोलीच्या महिला पोलीस भगिनींसोबत पालकमंत्री एकनाथ शिंदेचं रक्षाबंधन