दुपारची वेळ, सिद्धी घरात झोपली! काहीतरी चावल्यासारखं झालं म्हणून उठली, पाहते तर काय?

| Updated on: Oct 15, 2022 | 1:16 PM

एकदा, दोनदा नव्हे तर एकाच वेळी 3 वेळा सर्पदंश! चिपळूणमधील थरारक घटना

दुपारची वेळ, सिद्धी घरात झोपली! काहीतरी चावल्यासारखं झालं म्हणून उठली, पाहते तर काय?
सिद्धी चव्हाण, मृत तरुणी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun, Ratnagiri News) तालुक्यात एका गावात सर्पदंश झाल्याने तरुणीने जीव गमावलाय. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. दुपारच्या सुमारास सर्पदंश (Chiplun Snake Bite) झाल्यानंतर या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, तिचा मृत्यू (Death due to Snake Bite) झाला. गुरुवारी दुपारी ही घडली. धक्कादायक बाब म्हणजे, एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा या तरुणीने सापाने दंश केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

चिपळून तालुक्यातील घोणसरे गावातील तरुणावर काळानं घाला घातला. सिद्धी रमेश चव्हाण असं सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. तरुण मुलीच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबीयांना मोठा धक्काच बसलाय.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

हे सुद्धा वाचा

गुरुवारी दुपारी 3 वाजता सिद्धी घरात झोपली होती. त्यावेळी तिला काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून ती उठली. तिने पाहिलं तर चक्क सर्पदंश झाल्याचं तिच्या निदर्शनास आलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. विष बघता बघता शरीरात विष भिनलं. तिच्या शरीराचा रंग काळा पडू लागल्यानंतिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.

उंदराच्या मागावर असताना साप घरात शिरला असावा, असा अंदाज वतर्वला जातोय. सापाने तीन वेळा सिद्धीला दंश केला. दुपारी गाढ झोपेत असलेल्या सिद्धीची झोप दुर्दैवानं अखेरची झोप ठरली. गुरुवारीच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान सिद्धी चव्हाण या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेनं घाणसरे गावात हळहळ व्यक्त केली जातेय.