AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणा कोणाला स्थान?

मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, शिवसेना शिंदे गटाकडून या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अनेक मोठ्या नेत्यांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणा कोणाला स्थान?
एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 24, 2025 | 6:27 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून आता आपल्या स्टार प्रचारकांची यांदी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि युवा नेते यांचा समावेश आहे.  रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, दीपक केसरकर यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे या दिग्गज नेत्यांचा समावेश शिवसेनेकडून आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती होणार आहे. ज्या ठिकाणी अजित पवार गटासोबत युती होणार नाही, त्या ठिकाणी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान आज मुंबई महापालिकेसाठी अखेर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून युतीची अधिकृत घोषणा करण्यात आला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र युतीबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती, अखेर आज दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढवणार आहे.

मात्र जरी ठाकरे बंधूंकडून युतीची अधिकृत घोषणा झालेली असली तरी कोणाला किती जागा मिळणार हे अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाहीये, मुंबई महापालिकेत आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत युती झाल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला या ठिकाणी मोठं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?