Gadchiroli Heatstroke | पूर्व विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपुरात पारा 46.8 अंशांपर्यंत, गडचिरोलीत रोहयोच्या कामावरील तरुणीचा उष्माघाताने मृत्यू

विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. गडचिरोलीलगत असलेल्या चंद्रपुरात काल 46.8 अंश डिग्री तापमान होता. भर उन्हात काम केल्यामुळं उष्णाघातात या तरुणीचा जीव गेला. चार आणि पाच जूनपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

Gadchiroli Heatstroke | पूर्व विदर्भात उष्णतेची लाट, चंद्रपुरात पारा 46.8 अंशांपर्यंत, गडचिरोलीत रोहयोच्या कामावरील तरुणीचा उष्माघाताने मृत्यू
गडचिरोलीत रोहयोच्या कामावरील तरुणीचा उष्माघाताने मृत्यू
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 10:15 AM

गडचिरोली : रोजगार हमी योजनेचे काम करीत असताना एका तरुणीचा अचानक उष्माघाताने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या कामावर गेली. तिथं दुपारी तिला चक्कर आला. त्यानंतर तिला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील भिमपूर (Bhimpur) येथे ही घटना घडली. सुनीता सुंदर पुडो (Sunita Sundar Pudo) (वय 24) रा. नवरगाव असे मृत तरुणीचे नाव आहे. कोरची येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरगाव ग्रामपंचायतींतर्गत भिमपूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. नाला सरळीकरणाचे काम 27 मेपासून सुरू आहे. गुरुवारी या कामाचा शेवटचा दिवस होता. अनेक पुरुष आणि महिला मजूर सकाळी 7 वाजताच कामावर गेले होते. त्यात सुनीता पुडो हिचादेखील समावेश होता.

काम करताना आली भोवळ

काम करीत असताना सुनीताला अचानक भोवळ आली. लगेच तिला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुणे यांनी तिला मृत घोषित केले. सुनीताचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे डॉ. खुणे यांनी सांगितले. यावेळी सरपंच कौशल्या काटेंगे, के. बी. वासनिक, रोजगार सेवक शामराव अंबादे उपस्थित होते. मृत सुनीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कुटुंब भूमिहीन असल्याने मजुरी करूनच घरचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यामुळे शासनाने सुनीताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. गडचिरोलीतील हा दुर्गम भाग आहे. रुग्णालयाची सुविधा नाही, अशावेळी उपचारासाठी तिला उशीर झाला.

पूर्व विदर्भात उष्णतेची लाट

विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. गडचिरोलीलगत असलेल्या चंद्रपुरात काल 46.8 अंश डिग्री तापमान होता. भर उन्हात काम केल्यामुळं उष्णाघातात या तरुणीचा जीव गेला. चार आणि पाच जूनपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. गडचिरोलीलगत असलेल्या गोंदियातही काल 44.8 अंश डिग्री तापमान होता. आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र, आकाश ढगाळलेलं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागपुरातही कालचे तापमान 45 अंश डिग्री सेल्सीअस होते. वर्धा येथे 45.4 अंश डिग्री सेल्सीअस तापमान होते. या तापमानातही लोकं रोजगार हमीच्या कामावर जातात. यात या तरुणीचा बळी गेला.