AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil : त्यांच्याच लोकांवर त्यांचा विश्वास नाही… गोकुळमधील शपथप्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सतेज पाटील यांचा चिमटा

Satej Patil Criticized over Oath Case: गोकुळमधील शपथसत्रावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच थेट आवाहन केले आहे.

Satej Patil : त्यांच्याच लोकांवर त्यांचा विश्वास नाही... गोकुळमधील शपथप्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सतेज पाटील यांचा चिमटा
मंत्री हसन मुश्रीफ यांना सतेज पाटील यांचा चिमटा
| Updated on: Oct 18, 2026 | 12:06 PM
Share

भूषण पाटील, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीत अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक भलत्याच कारणाने गाजत आहे. सध्या गोकुळ ताब्यात घेण्यासाठी शपथसत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत पक्षांपेक्षा आणि आघाड्यांपेक्षा यल्लमा देवी, बाळूमामा यांचीच चर्चा अधिक आहे. सत्ताधारी पक्ष घाबरलेला असून त्यामुळे सभासदांना देवी आणि साधूसंतांच्या शपथा घालण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. आज एकूण 25 जागांसाठी 50 उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी या शपतपत्रावरून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला चिमटा काढला आहे. तर पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

त्यांच्याच माणसांवर त्यांचा विश्वास नाही

त्यांना त्यांच्याच लोकांवरती विश्वास नाहीये. म्हणून ते शपथ घेत आहेत. आम्ही असला कुठलाही प्रकार, उपक्रम करत नाहीत. आमच्यासोबत असलेल्या लोकांवरती आमचा विश्वास आहे. हा 100 शंभर टक्के भीती घालण्याचा प्रकार आहे. दहशत आणि भीती घालून मत ओढण्याचा हा प्रकार आहे. दूध उत्पादक आमच्यासोबत असतील याचा आम्हाला विश्वास आहे. निकाल लागल्यावर कोण कुणाच्या बाजूने आहे हे कळेल, असा सूचक इशाराही सतेज पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी यल्लमा देवीची शपथ मोडली तर देवी अंगावर उठेल. तर केपी पाटील यांनी बाळूमामाची शपथ मोडली तर ब्रेन स्ट्रोक येतो असे वक्तव्य केले. त्यावर सतेज पाटील यांनी सडकून टीका केली.

प्रतिष्ठा पणाला, देव आठवला

गोकुळ दूध संघाची ही निवडणूक गेल्या अनेक महिन्यांपासून विविध वादग्रस्त राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या कॅनव्हासवर आली आहे. अगोदरच अनेक सावळागोंधळ असल्याची टीका होत असताना मतदानाआधीच सभासद, ठरावधारकांना सौंदत्ती येथील डोंगरावर नेऊन यल्लमा देवीच्या भंडाऱ्यावर हात ठेवून शपथ दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर काहींना बाळूमामांची आण देण्यात आल्याचे समजते. शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांची राजर्षी शाहू विकास आघाडी विरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचं मोठे आव्हान आहे.

आज गोकुळसाठी मतदान

कोल्हापुरात आज गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण 35 मतदान केंद्रांवर 5, 418 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोकुळच्या संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत असून एकूण 50 उमेदवार रिंगणात आहेत.

यातील महायुतीमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाला 9 जागा, भाजप 7, शिवसेना 7 आणि जनसुराज्य 2 जागा लढत आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून 20, महिला प्रतिनिधी 2, ओबीसी 1, एसटी, एसटी 1 आणि व्हीजेएनटी 1 असे एकूण 25 संचालक निवडले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यातून मतदान पार पडणार आहे.

महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी ही हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात लढत आहे. तर महाविकास आघाडी प्रणित राजर्षी शाहू समविचारी आघाडी ही सतेज पाटील यांच्या नेतृत्वात लढत आहे. मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Follow Us
गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो.....
Gokul Elections : गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, के.पी. पाटील असं का म्हणाले?
अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह.....
Rain Update : अडीच महिन्यांनंतर महाराष्ट्रात पावसाची हजेरी; रत्नागिरी, चिपळूणसह ह्या जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ