AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar: ‘बरेच जण चुकीच्या गोष्टी पसरवण्यात माहीर…’ सुनेत्रा पवारांचा रोख कुणावर?

Suntera Pawar Big Statements: राज्याच्या अर्थखात्यावरून सध्या आमदार रोहित पवार यांनी भाजपवर चाप ओढला आहे. तर काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यानंतर गिरीश महाजन, मुख्यमंत्री यांच्याही प्रतिक्रिया धडकल्या.

Sunetra Pawar: 'बरेच जण चुकीच्या गोष्टी पसरवण्यात माहीर...' सुनेत्रा पवारांचा रोख कुणावर?
सुनेत्रा पवारांचा रोहित पवारांना मोठा टोला
| Updated on: Oct 18, 2026 | 9:32 AM
Share

Suntera Pawar on Rohit Pawar: सध्या राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा अत्यंत संयत सामना दिसत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताविरोधात सातत्याने पत्रकार परिषद घेऊन टीकेची झोड उठवली. तर आता त्यांनी सत्तेतील राष्ट्रवादीचे अर्थखाते भाजपने चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता चपखल प्रतिक्रिया दिली. काल मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील रणधुमाळीसाठी त्या बीड आणि नांदेडच्या दौऱ्यावर होत्या. काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा अर्थखाते राष्ट्रवादीला देण्याची मागणी पुन्हा रेटली. त्यानंतर त्यावर मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही प्रतिक्रिया धडकल्या.

बरेच जण चुकीच्या गोष्टी पसरवण्यात माहीर

बरेच जण चुकीच्या गोष्टी पसरवण्यात माहीर असतात असा अप्रत्यक्ष टोला सुनेत्रा पवार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. महायुतीत कुठलाही वाद नाही. वेगवेगळ्या विचारधारा असतात. पण महायुती म्हणून आपण एक असतो. सगळ्यांनी एका ताकदीने काम केलं पाहिजे. नांदेडसह मराठवाडाच्या विकासासाठी महायुती कटीबद्ध आहे. मराठवाड्याच्या लेकीचा तुम्हाला शब्द आहे. सातत्यपूर्ण पाठिंबा आवश्यक आहे. आपण मतदारांपर्यंत पोहचलं पाहिजे. नांदेड जिल्ह्याचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, असे त्या म्हणाल्या.

आपण युवकांच्या आंकाक्षासाठी एकत्र आलो आहोत. दादांचे विश्वासु शिलेदार, महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्र आलो आहे. बीडमध्ये पदवीधर निवडणुकीची उत्सुकता वाटली. बीड असो की नांदेड पदवीधरचा मोठा उत्साह आहे. विधानपरिषदेत आक्रमक भूमिका मांडणारे आमदार म्हणजे सतिश चव्हाण आहेत. अजितदादांनी 2007 मध्ये सतिश चव्हाणांना फोन करुन सांगितले की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, अशी आठवणही त्यांनी जागवली.

सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा विजयी करण्यासाठी तुमचा उत्साह भरपूर दिसतो. महायुतीची ताकत एकत्र करून आपल्याला पुढे जायचे आहे. अश्या धडाडीच्या नेत्याला पुन्हा विधान परिषदेत पाठवायचं आहे. महायुतीत कोणता ही वाद नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत. वेगवेगळ्या विचारधारा असतात. पण जेव्हा आपण महायुती म्हणुन उभे असतो तेव्हा समन्वय राखून कामं करायच आहे. कोणताही गैरसमज असेल तर तो चर्चेतून दूर केला पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

गिरीश महाजन यांनी घेतला खरपूस समाचार

आमच्याकडे किंवा इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा लक्ष घालण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पक्षांमध्ये लक्ष घातले तर पुढच्या काळामध्ये दोन-चार जागा जास्त निवडून येतील. पण हे काम सोडून कुणाला कोणता खाता द्यावं, अजितदादांच्या अपघाताचा काय करावे, अशा पद्धतीच्या चौकशी त्यांनी करू नये. प्रत्येक ठिकाणी तोंड घातलाच पाहिजे का याची काय गरज आहे. सुनेत्रा वहिनी यांनी त्यांना सांगितला आहे. यात मध्ये पडू नका. राजकीय फायदा घेऊ नका. पण तरीही टीव्हीवर दिसण्यासाठी अशा पद्धतीचे विषय करायचे मला वाटतं हे योग्य नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...