12 तास वीज, 15% व्याजासह एफआरपी देण्याची मागणी, यंदाच्या ऊस परिषदेत नेमके कोणते ठराव मंजूर ?

| Updated on: Oct 19, 2021 | 8:07 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद कोल्हापुरात पार पडली. या परिषदेत एफआरपी, उसतोड कामगार, कारखानदारांचे प्रश्न तसेच उस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा केली गेली. तसेच या परिषदेत ऊसाला 3300 रुपये उचल द्यावी.

12 तास वीज, 15% व्याजासह एफआरपी देण्याची मागणी, यंदाच्या ऊस परिषदेत नेमके कोणते ठराव मंजूर ?
raju shetty
Follow us on

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद कोल्हापुरात पार पडली. या परिषदेत एफआरपी, उसतोड कामगार, कारखानदारांचे प्रश्न तसेच उस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा केली गेली. तसेच या परिषदेत ऊसाला 3300 रुपये उचल द्यावी. गेल्या हंगामातील थकीत एफ आर पी 15% व्याजासह द्यावी, असे महत्त्वाचे ठराव केले गेले.

उस परिषदेत मंजूर करण्यात आलेले ठराव

1) यावर्षी ऊसाला 3300 रुपये उचल द्यावी.

2) या उचलीतील एफआरपीची रक्कम विनाकपात द्यावी आणि उर्वरित रक्कम मार्चपर्यंत द्यावी .

२)केंद्र सरकारने एफआरपीपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांना आयकर लावू नये.

3) गेल्या हंगामातील थकीत एफआरपी 15% व्याजासह द्यावी.

4) नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते ते द्यावेत.

5) शेती पंपाची वीज 12 तास द्यावी.

6) महापुरात नुकसान झालेल्या शेतीला गुंठ्याला 950 रुपये द्यावेत, पुरात बुडालेल्या ऊसाला अगोदर तोड द्यावी.

आता दाढी पांढरी झाली तरी प्रश्न तेच

या ऊस परिषदेत उस उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे हे सांगताना राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केला. पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती. आता दाढी पांढरी झाली तरी प्रश्न तेच आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आपण आणलं. पावसात भिजत-भिजत हे सरकार आलं. यांना महापुराची जाण असेल असं वाटलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही. सरकारनं काय मदत केली हे गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिलंच असेल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीचं संकट आलं. पैसे नाही म्हणालात आणि 11 टक्के महागाई भत्ता दिला, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

‘दिवाळीला मंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करा’

तसेच पुढे बोलताना, “दरसा गोड झाला नाही तर दिवाळीला शिमगा करु असं मी सांगितलं होतं. आता दिवाळीला गावात येणाऱ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करा. यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. शरद पवारांना फक्त पावसातील भाषणाची आठवण करुन देतो. साखरेला चांगले भाव आले असताना एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात आहे,” असा आरोप शेट्टी यांनी केला.

इतर बातम्या :

Maharashtra college Reopen | कृषी विद्यापीठ, संलग्न महाविद्यालये 20ऑक्टोबरपासून सुरु, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

SSC HSC Board Supplementary Exam Result | इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा बुधवारी निकाल

ठाकरे सरकार भेदभाव करतं? शाहसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस, दानवेंचा दिल्लीतून थेट आरोप

(Sugarcane Conference of Swabhimani Shetkari Sanghatana held in Kolhapur raju shetty keep different demand for sugar factory)