61 तासानंतर स्वाभिमानीचा रास्ता रोको स्थगित; काय फॉर्म्युला ठरला, ऊसाला किती दर मिळाला? राजू शेट्टींची किणी नाक्यावर मोठी घोषणा

Swabhimani Shetkari Saghatana Protest Called Off: गेल्या 61 तासांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन रास्ता रोको आंदोलन स्थगिती करण्यात आले. संघटनेने चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेतले आहे. काय ठरला फॉर्म्युला, ऊसाला किती दर मिळाला?

61 तासानंतर स्वाभिमानीचा रास्ता रोको स्थगित; काय फॉर्म्युला ठरला, ऊसाला किती दर मिळाला? राजू शेट्टींची किणी नाक्यावर मोठी घोषणा
61 तासानंतर स्वाभिमानीचा रास्ता रोको स्थगित; काय फॉर्म्युला ठरला, ऊसाला किती दर मिळाला? राजू शेट्टींची किणी नाक्यावर मोठी घोषणा
| Updated on: Nov 06, 2026 | 7:15 AM

Swabhimani Shetkari Saghatana Raju Shetti : गेल्या 61 तासांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. किणी टोलनाक्यावर नेते राजू शेट्टी यांनी याविषयीची मोठी घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मॅरेथॉन बैठकीनंतर साखर कारखानदारांनी दिलेला सुधारीत दराचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. तर शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती, तो बंदही मागे घेण्यात आला. यामुळे मालवाहतूकदारांचा जीव भांड्यात पडला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे आता पेटणार आहेत. संघटनेने चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेतले आहे. काय ठरला फॉर्म्युला, ऊसाला किती दर मिळाला?

काय ठरला फॉर्म्युला, ऊसाला किती दर मिळाला?

Loading...

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली. त्यात नवीन प्रस्तावावर सगळ्यांचे एकमत झाले. त्यानंतर चक्काजाम आंदोलन आणि उद्याचे कोल्हापूर बंद आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले.

पहिली उचल: प्रतिटन 3,900 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

हंगाम संपल्यावर: गळीत हंगाम पूर्ण झाल्यावर 100 रुपये अतिरिक्त देण्यात येतील

साखर दर: साखरेला प्रतिटन 4,500 रुपये दर मिळाल्यास आणखी 200 रुपये देण्यात येतील

काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाची पहिली उचल 4500 रुपयांहून 4200 रुपये देण्याची तयारी दाखवली होती. नवीन फॉर्म्युल्यानुसार एकूण दर 4200 रुपयांच्या घरात जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा तोडगा मान्य केला. यामुळे गेल्या 61 तासापासून सुरू असलेले चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गाने घेतला मोकळा श्वास

गेल्या अडीच दिवसांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. प्रवासी वाहतूक सुरू असली तरी मालवाहतूक आणि एसटी बसेस आणि इतर खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक खोळंबल्याने ऐन दिवाळीत वाहतूकदार वैतागले होते. तर दूरपर्यंत माल पोहचत नसल्याने व्यापारीही धास्तावले होते. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एसटी महामंडळालाही मोठा फटका बसला होता. दरम्यान चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याने आता राष्ट्रीय महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us