AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Crime : एकमुखी रुद्राक्ष, राजकीय व आर्थिक प्रगतीचे आमिष; 12 लाखाचा गंडा, वाचा नेमके प्रकरण काय ?

नरेंद्र पाटील हे धार्मिक वृत्तीचे असल्याने दारावर रुद्राक्षाच्या माळा विकण्यास येणाऱ्या अजित पवरा याच्याकडून माळ खरेदी केली. यानंतर पाटील आणि पवरा यांच्या ओळख निर्माण झाली. गेल्या पाच वर्षापासून पवरा आणि पाटील यांची ओखळ होती. हळूहळू पवरा याने पाटील यांच्या स्वभावाचा अंदाज घेतला.

Vasai Crime : एकमुखी रुद्राक्ष, राजकीय व आर्थिक प्रगतीचे आमिष; 12 लाखाचा गंडा, वाचा नेमके प्रकरण काय ?
आरोपी चकाचक सुरेशसिंग भोसले उर्फ अजित पवरा आणि जोरानाथ शंभुनाथ नाथ
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Feb 03, 2022 | 9:42 PM
Share

वसई : एकमुखी रुद्राक्ष परिधान केल्याने राजकीय व आर्थिक प्रगती होईल, असे आमिष दाखवून वसईत पंचायत समितीच्या माजी सभापतीला 12 लाखाचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात फसवणुकी(Fruad)चा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केले असून एक मुख्य आरोपी फरार आहे. चकाचक सुरेशसिंग भोसले उर्फ अजित पवरा (50) आणि जोरानाथ शंभुनाथ नाथ (65) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही भुरटे चोर आहेत. तर नरेंद्र कृष्णा पाटील(Narendra Krishna Patil) (65) असे फसवणूक झालेल्या माजी सभापतीचे नाव आहे. आरोपींनी अशाच प्रकारे आमिष दाखवून आणखी किती लोकांना लुबाडले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपी 2020 पासून पाटील यांना भूलथापा देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत हकीकत सांगितली. (The former chairman of Vasai Panchayat Samiti was robbed of Rs 12 lakh on the pretext of Rudraksha)

आरोपींनी अशी केली फसवणूक

अटक करण्यात आलेले दोन आरोपी चकाचक सुरेशसिंग भोसले उर्फ अजित पवरा आणि जोरानाथ शंभुनाथ नाथ हे दोघेही दारोदारी फिरुन रुद्राक्षाच्या माळ्या विकण्याचा धंदा करतात. चकाचक हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील असून सध्या तो भिवंडीत राहतो. तर जोरानाथ हा मूळचा राजस्थानातील पाली जिल्ह्यातील आहे. नरेंद्र पाटील हे धार्मिक वृत्तीचे असल्याने दारावर रुद्राक्षाच्या माळा विकण्यास येणाऱ्या अजित पवरा याच्याकडून माळ खरेदी केली. यानंतर पाटील आणि पवरा यांच्या ओळख निर्माण झाली. गेल्या पाच वर्षापासून पवरा आणि पाटील यांची ओखळ होती. हळूहळू पवरा याने पाटील यांच्या स्वभावाचा अंदाज घेतला. त्यानंतर पाटील यांच्या अध्यात्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत त्यांना भूलथापा देण्यास सुरवात केली. राजकीय प्रगती झालेल्या मोठ्या नेत्यांनी एकमुखी रुद्राक्ष परिधान केल्याने त्यांची राजकीय आणि आर्थिक प्रगती झाली आहे. तोच एकमुखी रुद्राक्ष आम्ही तुम्हाला देतो. तो एकमुखी रुद्राक्ष तुम्ही परिधान करा तुमचीही राजकीय, आर्थिक प्रगती होणार असे आमिष दाखवण्यास सुरुवात केली. आणि 2020 पासून पाटील यांना अशा भूलथापा देत त्यांच्याकडून सुमारे 12 लाख लुटले.

अजित पवरा याने आपला जोडीदार जोरानाथ आणि फरार आरोपी हे दोघे एकमुखी रुद्राक्ष विकतात. त्यांच्याकडून रुद्राक्ष घेऊन तुम्हाला देतो असे पाटील यांना सांगितले. अशा प्रकारे या तिघा आरोपींनी मिळून पाटील यांना लुबाडले. मात्र आरोपी आपली फसवणूक करीत आहेत हे लक्षात येताच पाटील यांनी 25 जानेवारी रोजी वसई पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपींना कसे पकडले?

नरेंद्र पाटील यांच्याकडे आरोपींची कुठलीही माहिती नव्हती. त्यांना केवळ इतकेच माहित होते की अजित पवरा हा जळगावचा आहे. या एका माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. रुद्राक्षाच्या माळा विकणारे लोक भिवंडीतील कोलगाव येथील झोपडपट्टीत राहतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस साध्या वेशात कोलगावातील झोपडपट्टीत पोहचले आणि त्यांनी जळगावचा असणारा रुद्राक्षाच्या माळा विकणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी पवराच्या नातेवाईकांचा शोध लावला आणि बनावट ग्राहक बनून त्यांच्याकडे पोहचले. त्यावेळी पोलिसांनी पवरा हा आपल्या कुटुंबासह गावी जात असल्याचे कळले. मात्र पवरा यांच्याकडे चांगल्या रुद्राक्षाच्या माळी मिळतात आणि आपल्याला 50 हजार रुपयांच्या माळी घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्यांना लगेच यायला सांगा असे सांगून पोलिसांनी नातेवाईकाल आरोपीला बोलावून घेण्यास सांगितले.

50 हजाराच्या हव्यासापोटी आला अन् जेरबंद झाला

आरोपीही 50 हजाराच्या हव्यासापोटी परत आला. आरोपी आल्यानंतर पोलिसांसोबत असलेल्या नरेंद्र पाटील यांनी त्याला ओळखले. त्यानंतर पोलिसांची आरोपीची गठडी वळली. तसेच त्याच्या साथीदाराच्याही मुसक्या आवळल्या. वसई पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विष्णु वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी केली. (The former chairman of Vasai Panchayat Samiti was robbed of Rs 12 lakh on the pretext of Rudraksha)

इतर बातम्या

पनवेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सहा मुलींची सुटका, दोन आरोपींना अटक

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली