Devdoot Sanman : जलप्रलयात जीव वाचवणाऱ्यांप्रति कृतज्ञता, टीव्ही 9 ‘देवदूत सन्मान 2021’

| Updated on: Aug 14, 2021 | 5:11 PM

TV9 Devdoot Sanman : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जलप्रलयात, अनेकांनी जीवाची बाजी लावून शेकडो लोकांचे प्राण वाचवले. या 'देवदूतांच्या' धाडसाला टीव्ही 9 मराठीचा सलाम. TV9 मराठी या देवदूतांचा विशेष सन्मान करत आहे.

Devdoot Sanman : जलप्रलयात जीव वाचवणाऱ्यांप्रति कृतज्ञता, टीव्ही 9 देवदूत सन्मान 2021
Devdoot Sanman
Follow us on

कोल्हापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जलप्रलयात, अनेकांनी जीवाची बाजी लावून शेकडो लोकांचे प्राण वाचवले. या ‘देवदूतांच्या’ धाडसाला टीव्ही 9 मराठी सलाम करत आहे. TV9 मराठी या देवदूतांचा विशेष सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त करत आहे. कृतज्ञ मी, कृतार्थ मी वाटेल असा गौरवसोहळा ‘देवदूत सन्मान 2021’ हा 15 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता टीव्ही 9 मराठीवर लाईव्ह पाहू शकाल.

देवदूत सन्मान 2021 या कार्यक्रमासाठी मंत्री महोदय जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, ऋतुराज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि अभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थि राहणार आहेत.

मान्यवरांच्या हस्ते महापुरात जीवाची बाजी लावून शेकडोंचे जीव वाचवणाऱ्या देवदुतांचा सन्मान केला जाईल.

पुरस्काराचं स्वरुप : जलप्रलयातील 11 देवदुतांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार, ट्रॉफी, रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू

प्रमुख पाहुणे : मंत्री महोदय जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, ऋतुराज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राजू शेट्टी आणि अभिनेत्री दीपाली सय्यद

VIDEO : देवदूत सन्मान