Mansoon : यंदा पाऊस येणार उशिरा, आणखी इतके दिवस पाहावी लागेल पावसाची वाट

| Updated on: May 19, 2023 | 7:42 PM

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ४ जूनला पावसाचे केरळमध्ये आगमन होईल. त्यानंतर पावसाला सुरुवात होईल. दरवर्षी केरळमध्ये एक जूनला पावसाचे आगमन होते.

Mansoon : यंदा पाऊस येणार उशिरा, आणखी इतके दिवस पाहावी लागेल पावसाची वाट
Follow us on

मुंबई : धान शेतीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय हवामान विभागाचं अंदाज आहे की, यंदा पाऊस तीन दिवस उशिरा येणार आहे. परंतु, यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ४ जूनला पावसाचे केरळमध्ये आगमन होईल. त्यानंतर पावसाला सुरुवात होईल. दरवर्षी केरळमध्ये एक जूनला पावसाचे आगमन होते.  यंदा पाऊस कमी पडू शकतो. कारण यंदा अल नीनोचा परिणाम पावसावर पडणार आहे. केंद्र सरकारच्या सल्लागार समितीने एक प्लान तयार केला आहे. ६५० जिल्ह्यात विशिष्ट प्लान तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. आयसीएआरने १५८ कमी पावसाच्या जाती उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

तलाव आणि नहर खोदण्याचे निर्देश

बीज बँकेमध्ये कमी पावसात प्रतिकार करू शकतील, असे बीज तयार केले जातील. कमी पावसात उत्पन्न चांगले घेता येईल. जिल्हाधिकारी आपआपल्या भागात पावसाच्या प्रमाणाचा डेटा एकत्रीत करतील.

हे सुद्धा वाचा

मनरेगाअंतर्गत तलाव आणि नहर खोदण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बीज तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २०१५ हे वर्ष वगळता गेल्या १८ वर्षात हवामानाचा अंदाज खरा ठरला. यंदाही हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात यंदा ९६ टक्के पावसाचा अंदाज

भारतात अन नीनोची स्थिती कमजोर झाली आहे. पावसाळ्यात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, पुढील अपडेट जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल. तोपर्यंत स्थिती आणखी स्पष्ट होईल. १९५० नंतर भारतात २१ वेळा एल निनो दिसला. त्यापैकी १५ वेळा देशात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली.

पाऊस केव्हा पडणार, याची शेतकऱ्यांना आतुरता वाटत असते. ही आतुरता कायम राहील. जोपर्यंत पाऊस पडणार नाही, तोपर्यंत शेतकरी वाट पाहणार आहे. पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी होईल. त्यानंतर कामाला लागेल. तोपर्यंत उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.