कोरोनाचे नियम पायदळी तुडवत वरात, डीजेच्या तालावर तरुणांचा ठेका, कोरोनाचा विसर..!

वडवणी तालुक्यातील पुनंदगाव येथे कोरोना काळात चक्क डीजे लावून लग्नाची वरात काढण्यात आली. डीजेच्या तालावर ग्रामीण भागातील तरुणाई बेभान होऊन थिरकताना पहावयास मिळाली. यावेळी कोरोनाचे सर्वच नियम पायदळी तुडविण्यात आले.

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत वरात, डीजेच्या तालावर तरुणांचा ठेका, कोरोनाचा विसर..!
बीडमध्ये कोरोना नियम पायदळी तुडवून डीजेच्या तालावर तरुणाईचा ठेका
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 11:11 AM

पुणे : ग्रामीण भागात तरुणाईला कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शासनाने घालून दिलेले नियम आणि अटी पाळण्याचं अनेक वेळा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. मात्र लग्नसोहळे, समारंभावेळी नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

डीजेच्या तालावर तरुणांचा झिंगाट डान्स, कोरोनाचे नियम पायदळी

वडवणी तालुक्यातील पुनंदगाव येथे चक्क डीजे लावून लग्नाची वरात काढण्यात आली. डीजेच्या तालावर ग्रामीण भागातील तरुणाई बेभान होऊन थिरकताना पहावयास मिळाली. यावेळी कोरोनाचे सर्वच नियम पायदळी तुडविण्यात आले.

जनतेला कोरोना नियमांचा विसर

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शासन आणि प्रशासन कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आश्वासक पावलं उचलत आहे. त्यानुसार शासनाने नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. शासन जनजागृतीत देखील कमी नाहीय. मात्र ग्रामीण आणि शहरी भागातील देखील तरुणाईला शासनाच्या नियम आणि अटींचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. लग्नसोहळे सण समारंभ वगैरे साजरे करताना लोकांनी कोरोनाचं भान ठेवायला हवं असं वारंवार सांगूनही लोकांना मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचा विसर पडताना दिसतोय.

(Youth Dance on DJ beat break the Corona rules in beed)

हे ही वाचा :

VIDEO | ‘सरपंच’ आईचा कानाडोळा, वाढदिवसाला गर्दी जमवत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा डीजेवर ठेका