आमचा एकच मंत्री, तो राम मंदिर कसा बांधेल? : संजय राऊत

अयोध्या (उत्तर प्रदेश) : राम मंदिर कधी बांधायचा, हा प्रश्न मोदी-योगींना विचारा, एकच मंत्री असलेल्या आम्हाला कसे विचारता?, असे प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांन राम मंदिराच्या प्रश्नावर अयोध्येत ‘टीव्ही 9 मराठी’सोबत संवाद साधला. तसेच, उद्धव ठाकरे जेव्हा देशाचे पंतप्रधान बनतील, तेव्हा राम मंदिराचा प्रश्न विचारा, असेही संजय राऊत म्हणाले. “राम […]

आमचा एकच मंत्री, तो राम मंदिर कसा बांधेल? : संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

अयोध्या (उत्तर प्रदेश) : राम मंदिर कधी बांधायचा, हा प्रश्न मोदी-योगींना विचारा, एकच मंत्री असलेल्या आम्हाला कसे विचारता?, असे प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांन राम मंदिराच्या प्रश्नावर अयोध्येत ‘टीव्ही 9 मराठी’सोबत संवाद साधला. तसेच, उद्धव ठाकरे जेव्हा देशाचे पंतप्रधान बनतील, तेव्हा राम मंदिराचा प्रश्न विचारा, असेही संजय राऊत म्हणाले.

“राम मंदिर कधी बांधायचा, हा  प्रश्न मोदी आणि योगींना विचारा. केंद्रात सरकार त्यांचे आहे. आमचा फक्त एक मंत्री आहे. एक मंत्री मंदिर बांधणार का?” – संजय राऊत, खासदार, शिवसेना

तसेच, अयोध्या भगवामय झाले आहे, आता देश भगवामय करायचा आहे, असा निर्धारही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

“आम्ही सभा घेणार नव्हतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला श्री रामचंद्रांचे दर्शन घ्यायला जाणार अशी घोषणा केली होती. जर ते येत आहेत, तर त्यांच्यासोबत शिवसैनिक येणारच. त्यामुळे आम्ही व्यवस्था करीत आहोत.” असे संजय राऊत म्हणाले.

VIDEO : पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौरा आहे. या दौऱ्याची शिवसेनेने जोरदार तयारी केली असून शिवसैनिकांना अयोध्येला नेण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून काल दुपारी दोन वाजता अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना झाली. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून खानपान भरून ही रेल्वे रवाना करण्यात आली. 21 डब्यांची ही रेल्वे शनिवारी रात्री अयोध्येत पोहोचणार आहे.

प्रवासात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या हद्दीपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयोध्येत जाण्यासाठी शिवसैनिकांत मोठा उत्साह आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना झालेल्या ट्रेनमध्ये साधारणपणे दोन हजार शिवसैनिक होते. पुढे विविध ठिकाणांहून यामध्ये शिवसैनिकांचा समावेश होणार आहे. ठाणे, कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खांडवा, ईटरसी, जबलपूर, सतना, अलाहाबाद, फैजाबाद या मार्गे अयोध्येत ही ट्रेन पोहोचणार आहे.

दरम्यान, औरंगाबादहूनही शिवसैनिकांचा पहिला जथ्था काल सकाळीच अयोध्येला रवाना झाला. ठाण्याहून 600, कल्याण 300, भिवंडी 250, पालघर 100, मीरा भाईंदर 250 आणि इतर विविध ठिकाणांहून आलेले 100 शिवसैनिक ट्रेनमध्ये आहेत. पुढे ही संख्या वाढत जाणार आहे.

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.