ऑक्सिजन टँकर काळाबाजारावर अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन, गडकरींचा थेट विशाखापट्टनमला, पहा काय घडलं?

| Updated on: May 09, 2021 | 7:09 PM

गडकरी यांनी आज भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपावेळी बोलत होते. त्यावेळी त्यांना काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबतचा एक प्रकार सांगितला.

ऑक्सिजन टँकर काळाबाजारावर अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन, गडकरींचा थेट विशाखापट्टनमला, पहा काय घडलं?
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोना संकटाच्या काळात विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी काहीजणांकडून परिस्थिती फायदा उठवण्याचा प्रयत्न होत आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार होऊ लागलाय. असाच एक प्रकार खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. गडकरी यांनी आज भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपावेळी बोलत होते. त्यावेळी त्यांना काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबतचा एक प्रकार सांगितला. (Ashok Chavan calls Union Minister Nitin Gadkari)

अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन का?

राज्यात ऑक्सजिनचा तुटवडा भासत असल्यामुळे बाहेर राज्यातून ऑक्सिजन आणला जात आहे. अशावेळी नांदेडला ऑक्सिजन पुरवठा करणारा एक टँकर विशाखापट्टणच्या एका ट्रान्सपोर्टरने पळवून नेला. त्याबाबत अशोक चव्हाण यांचा आपल्याला फोन आला. त्या ट्रान्सपोर्टरने आपल्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. त्यानंतर त्याचे टँकर जप्त केले. मी रात्री 12 – 1 वाजता त्या ट्रान्सपोर्टला फोन केला आणि त्याला दाब टाकला. त्याला सांगितलं ही हे बरोबर नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई करु, असं गडकरी यांनी सांगितलं.

‘शोषण होणार नाही याची काळजी घेताना संघर्षही टाळायचा आहे’

आता रुग्णवाहिका, टँकर्स, हॉस्पिटल, डॉक्टर, मेडिकलवाले यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन कुठेही गरीब माणसाची पिळवणूक करता कामा नये. पण आता ऑडिटिंग करणं, रेड मारणं, चौकश्या करणं, डॉक्टरांशी भांडण करणं याची वेळ नाही. म्हणजेच आपल्याला लोकांचं शोषण होता कामा नये याचीही काळजी घ्यायची आहे आणि संघर्षही टाळायचा आहे. अशाप्रकरचा संघर्ष करुन आहे ती व्यवस्थाही बंद करणं हे समाजासाठी उपयुक्त ठरणार नाही, असं गडकरी यांनी म्हटलंय.

प्यारेखान यांचे आभार मानले

प्यारेखान हे आपले कार्यक्रते आहे. यांनी खूप मेहनत केली. नागपूरला आणि विदर्भाला वाचवण्यात यांचे प्रयत्न कामी आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात टँकर उपलब्ध करुन दिले. आपल्याकडे सरकारचे फक्त 7 टँकर होते. त्यातील 4 पळून गेले, उरले फक्त 3. एका टँकरची क्षमता 12 टन असल्यामुळे आपल्याला फक्त 36 टन ऑक्सिजन मिळाला असता आणि आपली गरज ही सव्वा दोनशे टन इतकी आहे. अशावेळी त्यांनी 19 टँकर उपलब्ध करुन दिले, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरसोबत आता पोलीस! गडकरींची माहिती, मुंबई महापालिका आयुक्तांचंही कौतुक

रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका, तिसरी लाट दारावर, मास्टर प्लान करा: नितीन राऊत

Ashok Chavan calls Union Minister Nitin Gadkari