नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरसोबत आता पोलीस! गडकरींची माहिती, मुंबई महापालिका आयुक्तांचंही कौतुक

रुग्णालयातील बेड, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार अशा सर्व गोष्टींमध्ये गडकरी यांनी स्वत: लक्ष घातलं आहे.

नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरसोबत आता पोलीस! गडकरींची माहिती, मुंबई महापालिका आयुक्तांचंही कौतुक
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील बेड, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार अशा सर्व गोष्टींमध्ये गडकरी यांनी स्वत: लक्ष घातलं आहे. त्याचाच भाग म्हणून आता नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरमध्ये पोलीस तैनात असतील, अशी माहिती गडकरींनी दिलीय. नागपुरात ऑक्सिजन टँकर पळवण्याची घटना घडली होती. त्यानंतर गडकरी यांनी हा निर्णय घेतलाय. (Information from Nitin Gadkari on corona vaccination and oxygen supply)

मुंबई महापालिका आयुक्तांचं कौतुक

मुंबईतील कोरोना लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांना लस न घेता आल्या पावली परत फिरावं लागत आहे. त्यामुळे मुंबईत अजून लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मोठ्या पार्किंगची जागा महापालिकेनं ताब्यात घेत लसीकरण सुरु केलं आहे. त्यावरुन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचं कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. सध्या मॉल्स बंद आहेत. त्यांच्या पार्किंगमध्ये लसीकरण करता येते का? याची चाचपणी करणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

लस आणि ऑक्सिजनबाबत गडकरी काय म्हणाले?

राज्यात कोरोना लस आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना गडकरी यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. येत्या 5 ते 6 दिवसांत राज्यातील लसींची अडचण दूर होईल, अशी माहिती त्यांनी दिलीय. त्याचबरोबर ऑक्सिजनचे ऑडिट करणं गरजेचं आहे. कारण 30 – 30 टक्के ऑक्सिजन लिकेज निघत असल्याचंही ते म्हणाले.

लसीकरणाबाबत राजकारण करु नका

राज्यात लसीकरणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. श्रेय लाटण्यासाठी विविध पक्षाते नेते आणि कार्यकर्ते धडपड करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे लसीकरणाबाबत राजकारण करु नका, असा सल्ला गडकरी यांनी दिलाय. बोर्ड लावा पण झेंडे लावण्याची गरज नाही. लोकांनी माहिती आहे. राजकारण केलेलं लोकांना आवडत नाही. तुम्ही जे करणार आहात त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं हे राजकारण नाही, असा सल्लाही गडकरींनी दिलाय.

संबंधित बातम्या :

सर्वसामान्यांसाठी “माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा, आपण कोरोनाची तिसरी लाट परतवू: उद्धव ठाकरे

नव्वदीतील ‘तरुणांचे’ लसीकरण! 98 वर्षीय आजी आणि 99 वर्षीय आजोबांनी घेतली लस

Information from Nitin Gadkari on corona vaccination and oxygen supply