शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पालघरचा झेंडा

| Updated on: Feb 04, 2021 | 12:25 PM

सफाळे येथील शेतकरी जयेश राऊत यांच्या दहा वर्षीय विधीश याने राष्ट्रीय योगासन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पालघरचा झेंडा
Follow us on

पालघर : प्रशिक्षक नसतानाही स्वतःच्या जिद्दीवर पालघर तालुक्यात सफाळे ग्रामीण (Vidhish Wins Third Price In National Yoga Competition) भागातील एका शेतकऱ्याच्या 10 वर्षीय मुलाने राष्ट्रीय योगासन स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाला गवसणी घातलीये. विधीशच्या या चमकदार कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे (Vidhish Wins Third Price In National Yoga Competition).

सफाळे येथील शेतकरी जयेश राऊत यांच्या दहा वर्षीय विधीश याने राष्ट्रीय योगासन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सफाळे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळेत तो इयत्ता चौथीत तो शिकत आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून विधीशने योगासनाला सुरुवात केली. विशेष म्हणजे ग्रामीण परिसर असलंयाने कोणत्याही प्रशिक्षकाशिवाय त्याने ही किमया साधली आहे.

अॅडव्हेन्चर्स समर कॅम्पमध्ये विधीशने सादर केलेल्या काही व्यायामातून तो योगासने करण्यास पात्र असल्याचे शिक्षकांनी त्याच्या पालकांना सांगितलं. त्यांच्यातले गुण हेरत विधीशचे वडील जयेश आणि आई कृपाली यांनी त्याच्यावर मेहनत घ्यायला सुरुवात केली. त्यातून तो घडत गेला. जिल्हा योग संघटनेच्या उपाध्यक्षा रुचिता ठाकूर यांनी विधीशला योगासनासाठी प्रोत्साहन देऊन त्याला स्पर्धारुपी व्यासपीठ मिळवून दिले.

विधीशने पहिल्याच प्रयत्नात राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत धारवी स्पोर्ट्स कॉम्प्लेस येथे आपल्या कलागुणांची छाप पाडत पहिल्या सात स्पर्धकात स्थान मिळवले. त्यानंतर 32 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर विधीशने राज्य, जिल्हा, मुंबई उपनगर, कला क्रीडा महोत्सव अशा विविध पातळीवरील योगासन स्पर्धेत भाग घेऊन जिद्दीच्या जोरावर त्याने अनेक पारितोषिके आणि पदके प्राप्त केली. ही त्याची उपलब्धी आहे (Vidhish Wins Third Price In National Yoga Competition).

अलीकडेच जानेवारीत झालेल्या ऑनलाईन राष्ट्रीय योगासन स्पर्धेत विधीशने आपल्या लवचिक शरीराची किमया दाखवत कठीण योगासने करत प्रतिस्पर्धी ना कडवी झुंज देत त्याने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या चमकदार कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अवघ्या दहाव्या वर्षी विधीशने अनेक पदके आपल्या पदरात पाडली असली तरी ग्रामीण भागात स्पर्धात्मक योगासन शिकविणाऱ्या प्रशिक्षकांची उणीव त्याला भासत असल्याचे त्यावर शेतकरी वडील जयेश सांगतात.चांगल्या प्रशिक्षकांचा शोध घेत असून ते मिळाल्यास विधीशचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वासही ते व्यक्त करतात.

Vidhish Wins Third Price In National Yoga Competition

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत शाळेची बेल वाजणार, पालकांना मेसेज, काय काय करावं लागणार?