Pandharpur Tragedy : विहीर खोदताना घात कसा झाला? शेवटच्या क्षणी कामगारांसोबत काय घडलं? चौकशीतून उलगडा होणार

Pandharpur Tragedy : पंढरपुरात विहीर खोदताना कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं आहे. आता या दुर्घटनेची चौकशी होणार आहे.

Pandharpur Tragedy : विहीर खोदताना घात कसा झाला? शेवटच्या क्षणी कामगारांसोबत काय घडलं? चौकशीतून उलगडा होणार
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 10:22 AM

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील विहीर दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. या तिघांचा मृतदेह शोधण्यास एनडीआरएफच्या टीमला यश आलं. आता प्रशासनाने विहिरीतून तिघांचे मृतदेह यशस्वीरित्या बाहेर काढले आहेत. या दुर्घटनेची समिती स्थापन करून चौकशी होणार आहे. त्यामुळे विहीर खोदताना कामगारांसोबत नेमकं काय घडलं, याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे विहीर दुर्घटनेची संपूर्ण माहितीचा उलगडा होणार आहे.

पंढरपूरच्या विहीर दुर्घटनेत मंगेश मोरे, सिद्धू घाडगे आणि तानाजी घोडके असे तीन मृतदेह काढण्यास प्रशासनाला यश आलं आहे.  जवळपास 22 तासानंतर तिसरा मृतदेह सापडण्यात प्रशासनाला यश आलं आहे. आता चौथा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या विहीर दुर्घटनेची समिती स्थापन करून चौकशी होणार आहे. प्रथमदर्शनी ब्लास्टिंगमुळे ही दुर्घटना घडली असावी, असं बोललं जात आहे. दुर्घटनेनंतर शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडाची तपासणी करून ब्लास्टिंगमध्ये कुठले केमिकल वापरले, याचाही उलगडा होणार आहे. जिल्ह्यातील अशा पद्धतीने काम सुरू असलेल्या विहिरींचे प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती  सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली. तसेच चोवीस तासांहून अधिक काळ जिल्हाधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून बचाव कार्यात सहभागी होणार आहे.

Loading...

या दुर्घटना प्रकरणातील घटनेची संपूर्ण चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाने एक समिती स्थापन करून होणार आहे. या शोधकार्यात विहिरीतून बाहेर काढलेल्या दगडांची तपासणी करून त्यावर असणाऱ्या केमिकलची ही तपासणी होणार आहे. तसेच विहीर खोदताना केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगची परवानगी घेऊनच विहीर खोदावी, असे आव्हान सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी दिली. या विहीर दुर्घटनेतील मंगेश मोरे यांचा दुसरा मृतगेह पहाटे चार-साडेचारच्या दरम्यान सापडलला. तर तिसरा मृतदेह तानाजी घोडके या कामगाराचा सकाळी साडेसात वाजता सापडला आहे. थोडी विश्रांती घेतल्यानंतर एनडीआरएफच्या शोध कार्याला दीड तासानंतर पुन्हा सुरुवात झाल्याचे दिसून आलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us