VIDEO | मुंडे बहीण-भावात पुन्हा शाब्दिक युद्ध, कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या, धनंजय मुंडेंचं आव्हान

| Updated on: Mar 14, 2022 | 8:18 AM

बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरुन मुंडे बहीण भावात यंदा चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. दरम्यान, यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. आता याच मुद्द्यावरुन मुंडे बहीण-भावात चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळाली. यावर भाऊ धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंना खुल आव्हानच दिलंय.

VIDEO | मुंडे बहीण-भावात पुन्हा शाब्दिक युद्ध, कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या, धनंजय मुंडेंचं आव्हान
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे
Image Credit source: TV9
Follow us on

बीड : बीड (Beed) जिल्हा म्हटलं की सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भावंडांचा वाद आलाच. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका टीप्पणी करण्याची कोणतीही संधी हे मुंडे भावंड सोडत नाही. आधी फडणवीसांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना लक्ष्य करायच्या तर आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना अनेकदा लक्ष्य करताना दिसल्यायेत. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरुन मुंडे बहीण भावात यंदा चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. दरम्यान, यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं सांगत त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. आता याच मुद्द्यावरुन मुंडे बहीण-भावात चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळाली. भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर देत, कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या, असं आव्हानच दिलंय.

धनंजय मुंडेंनी केली होती टीका

ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. असे बोलून तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. असा टोला त्यांनी लगावला आहे. समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार झालाय, बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका. अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली होती.

प्रीतम मुंडेंच्या पत्राचा दाखला

बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवरुन पंकजा मुंडे अनेकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य करतात. पुन्हा एकदा त्यांनी याच मुद्द्याला धरुन टीका केली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं सांगत त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. आता यावरुन दोन्ही भावंडात जुंपलेला वाद खुल्या व्यासपीठापर्यंत जातो का, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

इतर बातम्या

टेलिकॉम क्षेत्राचे रुपडे पलटणार; ‘5G’बाबत माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले वैष्णव?

Video : खाद्यपदार्थांवरचे प्रयोग काही थांबेना! आता Omeletteची ‘ही’ नवी Recipe होतेय Viral

Photo: युद्धात बेचिराख आणि उद्धवस्त झालेलं युक्रेन आणि तिथली माणसं…