मोठी बातमी! खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी, गोंधळ झाल्याने… नेमकं काय घडलं?

परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बाहेर गोंधळ झाला आहे.

मोठी बातमी! खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी, गोंधळ झाल्याने... नेमकं काय घडलं?
parbhani Melawa Rada news
Image Credit source: Google
| Updated on: Aug 30, 2026 | 4:13 PM

परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बाहेर गोंधळ झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा शेतकरी मेळावा रद्द करण्यासाठी संजय जाधव यांना फोन केला होता. त्यांनी फोन करुन हा मेळावा रद्द करावा अन्यथा मी तिथे येईन असा इशारा दिला होता. मात्र जाधव यांनी मेळावा रद्द न केल्यामुळे आता मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. या ठिकाणी काय घडलं ते जाणून घेऊयात.

परभणीत काय घडलं?

परभणीतील शेतकरी मेळाव्याला जिल्ह्यासह आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या कार्यक्रमाला हजर आहेत. खासदार संजय जाधव भाषण करत असताना कार्यक्रमस्थळी असलेल्या काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मोठा राडा झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना सभास्थळावरून बाहेर काढले. सध्या मेळाव्याच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगेंच्या विनंतीवर जाधव काय म्हणाले होते?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा शेतकरी मेळावा रद्द करण्यासाठी संजय जाधव यांना फोन केला होता. मात्र कार्यक्रम रद्द करण्यास नकार देत जरांगे पाटलांनी म्हटले होते की, ‘जरांगे पाटील यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे. 11 वाजता आपला नियोजीत कार्यक्रम आहे. जवळजवळ 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी चालू होती. मला सकाळी 11 वाजताच फोन आलाय की कार्यक्रम रद्द करा. मी दादाला विनंती केली की दादा तुम्ही मला रात्री जरी बोलले असते तरीही मी कार्यक्रम रद्द केला असता. आता लोक येऊन बसले आहेत आणि आता मी कार्यक्रम रद्द करावा असं माझ्या मनाला सयुक्तिक वाटत नाही. ज्या तुमच्या भावना आहेत त्या माझ्याही आहेत. तुमच्यापेक्षा माझ्या भावना वेगळ्या नाहीत. तुमच्या प्रत्येक भावनेशी आम्ही एकरुप आहोत. त्यामुळे असं काही वेगळं सांगायची गरज नाही.

Follow Us