मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे दरवाजे बंद? पार्थ पवारांना मिळणार सर्वात मोठी जबाबदारी

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचं विलीनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, मात्र आता विलीनीकरणाचे दरवाजे जवळपास बंद होण्याची शक्यता असून, पार्थ पवार यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे दरवाजे बंद? पार्थ पवारांना मिळणार सर्वात मोठी जबाबदारी
पार्थ पवार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 5:47 PM

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं.  अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचं विलीनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू झाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची एकमतानं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे. तर दुसरीकडे अशी देखील माहिती समोर येत आहे, की पार्थ पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत मोठी घोषणा होणार आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घतेली, या शपथविधी सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत एक मतानं सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गट नेत्या म्हणून निवड करण्यात आली, तसेच त्यांना राष्ट्रवादी संदर्भात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देखील देण्यात आले. दरम्यान त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान आजच्या या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची एकमताने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या संदर्भांत निर्णय घेण्यात आला होता, आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत  आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र आता आज बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एक तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत, तर दुसरीकडे पार्थ पवार हे राष्ट्रीय सरचिटणीस होण्याची शक्यता आहे .  त्यामुळे आता पुन्हा एकदा विलनीकरणाचा मुद्दा हा मागे पडण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाचे दरवाजे बंद झाले आहेत का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Follow Us