पेट्रोलची शंभरी, दाढीवाला फलंदाज आणि ‘मॅन ऑफ दी मॅच’; राष्ट्रवादीची ठाण्यात होर्डिंगबाजी

पेट्रोलचे दर शंभर रुपयांवर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. (petrol price hike, ncp display Hoarding against bjp in thane)

पेट्रोलची शंभरी, दाढीवाला फलंदाज आणि 'मॅन ऑफ दी मॅच'; राष्ट्रवादीची ठाण्यात होर्डिंगबाजी
Hoarding in thane

ठाणे: पेट्रोलचे दर शंभर रुपयांवर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने मोदी सरकार ‘मॅन ऑफ दी मॅच’, ‘अच्छे दिनाच्या शुभेच्छा’, असा खोचक मजकूर असलेली होर्डिंग्ज ठाण्यात लावली आहेत. राष्ट्रवादीच्या या हटके आणि खोचक होर्डिंगबाजीची ठाण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. (petrol price hike, ncp display Hoarding against bjp in thane)

भाजपच्या सत्ता काळातत इंधन दरवाढीचा आलेख चढाच राहिला आहे. मे महिन्यामध्ये सुमारे 14 वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे होर्डिंग्ज संपूर्ण ठाणे शहरात लावले आहेत. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे. त्यामुळे हे होर्डिंग्ज ठाणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरली आहेत.

दाढीवाल्या फलंदाजाची चर्चा

पश्चिम बंगालची निवडणूक संपल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील 4 तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झालीय. ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. डिझेलच्या किंमतीत 29 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे. मुंबई ठाण्यात आज पेट्रोलचा भाव 100.4 रुपये आणि 91.87 रुपये प्रति लिटर आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. सबंध ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जवर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. “मॅन ऑफ दी मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा खोचक मजकूर या होर्डिंग्जवरवर लिहिण्यात आला आहे.

परांजपेंकडून निषेध

गेले काही दिवस सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध ठाणे शहरात होर्डिंग्ज लावले आहेत. त्यावर एक बॅट्समॅनचे चित्र आहे. त्याला आम्ही मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे. त्यावर शंभरी पार केल्याबद्दल अच्छे दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते “बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” असे ओरडत होते. मात्र, आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे. यूपीएच्या काळात पट्रोल-डिझेल कधीच एवढ महाग झाले नव्हते. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत, असं राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितलं. (petrol price hike, ncp display Hoarding against bjp in thane)

 

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Rate Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय?

Petrol Diesel Price Today | मे महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तब्बल 9 वेळा वाढ, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

(petrol price hike, ncp display Hoarding against bjp in thane)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI