AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today | मे महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तब्बल 9 वेळा वाढ, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे. (Petrol Diesel Price Today on 16 May 2021)

Petrol Diesel Price Today | मे महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत तब्बल 9 वेळा वाढ, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर
पेट्रोल आणि डिझेल दर
| Updated on: May 16, 2021 | 9:07 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. नुकतंच तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलच्या दर जारी करण्यात आले आहेत. आज पुन्हा एकदा देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ  झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा दरही 90 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. (Petrol Diesel Price Today on 16 May 2021 latest price Update fuel rates)

मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीकडे 

इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 18 ते 25 पैसे आणि डिझेलच्या 27 ते 30 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे. तर सध्या जयपूर आणि मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीची दिशेने वाटचाल करत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 9 वेळा वाढल्या

दरम्यान मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 9 वेळा वाढल्या आहेत. देशभरातील विविध राज्यात लॉकडाउन, नाईट कर्फ्यू किंवा तत्सम निर्बंधांमुळे इंधनाची मागणी कमी झाली आहे. गेल्या 18 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यानंतर 4 मे नंतर पुन्हा दरवाढ सुरु आहे. मे महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 2.04 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 2.34 रुपयांनी वाढली आहे.

राज्यातील पेट्रोलची शंभरी गाठणारे जिल्हे कोणते? 

  • बीड –  ₹ 100.35
  • गोंदिया – ₹ 100.01
  • जालना – ₹ 100.25
  • रत्नागिरी – ₹ 100.45
  • सिंधुदुर्ग – ₹ 100.07
  • वर्धा – ₹ 100.34
  • यवतमाळ – ₹ 100.16

(Petrol Diesel Price Today 16 May 2021)

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 98.63 ₹ 88.79
2 अकोला ₹ 98.73 ₹ 88.91
3 अमरावती ₹ 99.12 ₹ 89.28
4 औरंगाबाद ₹ 99.45 ₹ 89.57
5 भंडारा ₹ 99.71 ₹ 89.85
6 बीड ₹ 100.35 ₹ 90.43
7 बुलडाणा ₹ 99.28 ₹ 89.44
8 चंद्रपूर ₹ 98.77 ₹ 88.96
9 धुळे ₹ 99.25 ₹ 89.39
10 गडचिरोली ₹ 99.61 ₹ 89.77
11 गोंदिया ₹ 100.01 ₹ 90.13
12 मुंबई उपनगर ₹ 98.88 ₹ 90.40
13 हिंगोली ₹ 99.83 ₹ 89.96
14 जळगाव ₹ 99.84 ₹ 89.97
15 जालना ₹ 100.25 ₹ 90.34
16 कोल्हापूर ₹ 99.01 ₹ 89.17
17 लातूर ₹ 99.94 ₹ 90.06
18 मुंबई शहर ₹ 98.88 ₹ 90.40
19 नागपूर ₹ 98.95 ₹ 89.11
20 नांदेड ₹ 101.71 ₹ 91.77
21 नंदूरबार ₹ 99.42 ₹ 89.55
22 नाशिक ₹ 98.77 ₹ 88.92
23 उस्मानाबाद ₹ 99.28 ₹ 89.42
24 पालघर ₹ 99.01 ₹ 89.12
25 परभणी ₹ 101.13 ₹ 91.19
26 पुणे ₹ 99.12 ₹ 89.25
27 रायगड ₹ 98.73 ₹ 88.85
28 रत्नागिरी ₹ 100.45 ₹ 90.56
29 सांगली ₹ 98.73 ₹ 88.90
30 सातारा ₹ 99.17 ₹ 89.33
31 सिंधुदुर्ग ₹ 100.07 ₹ 90.19
32 सोलापूर ₹ 99.43 ₹ 89.57
33 ठाणे ₹ 98.50 ₹ 88.43
34 वर्धा ₹ 100.34 ₹ 90.02
35 वाशिम ₹ 99.41 ₹ 89.42
36 यवतमाळ ₹ 100.16 ₹ 89.61

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today on 16 May 2021 latest price Update fuel rates)

संबंधित बातम्या : 

कोरोना काळात PF खाते ठरणार मदतगार, आठवड्याभरात खात्यात ‘एवढे’ येणार पैसे

कोरोना काळातही ‘या’ कंपनीकडून 36000 रुपयांची ऑफर, स्वस्तात खरेदी करा बेस्ट फॅमिली कार

LIC न्यू जीवन शांती: दरमहा 8750 रुपये खात्यात होणार जमा, अशी करा गुंतवणूक

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?