Petrol Prices: जगात जर्मनी भारतात परभणी, पेट्रोलचे सर्वात महाग पेट्रोल परभणीत का? वाचा सविस्तर

| Updated on: Mar 31, 2022 | 5:10 PM

मागील दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पेट्रोलच्या दरात 9 वेळा वाढ झाली आहे. 22 मार्च नंतर 24 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या दहा दिवसात इंधनाचे दर तब्बल 6.84 रुपयांनी वाढले आहेत.

Petrol Prices: जगात जर्मनी भारतात परभणी, पेट्रोलचे सर्वात महाग पेट्रोल परभणीत का? वाचा सविस्तर
Follow us on

परभणी | जगात जर्मनी अन् भारतात परभणी (Parbhani) या उक्तीनुसार, परभणीकरांची असंख्य वैशिष्ट्य सांगितली जातात. त्यातलं आणखी एक वैशिषट्य म्हणजे संपूर्ण भारतात परभणी जिल्ह्याला (District) सर्वाधिक जास्त भावात पेट्रोलची विक्री (Petrol Price) केली जाते. आज 31 मार्च रोजी परभणीतील पेट्रोलचे दर 119 रुपये 74 पैसे  एवढे आहेत. तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत आणि देशातील इतर शहरांमधील पेट्रोलचे दर यापेक्षा कमीच आहेत. मुंबईत आजचे पेट्रोलचे दर 116.72 तर पुण्यात 116.51 रुपये एवढे नोंदले गेले. मात्र परभणीतच पेट्रोलचे दर जास्त का असतात, असा प्रश्न उपस्थित होतो. पेट्रोल पंप धारकांशी याविषयी बातचित केली असता, इंधनाच्या दळणवळणाच्या खर्चापायी परभणीत अधिक दर असल्याची बाब समोर आली आहे.

परभणीतील जास्त दरांचे कारण काय?

इंधन दरवाढीमुळे राज्यातील जनतेला भर उन्हाळ्यात आर्थिक झळाही सोसाव्या लागत आहेत. परभणीला महागाईची ही झळ काही प्रमाणात जास्त बसतेय. त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे मराठवाड्यात इंधन साठवण्यासाठी डेपो उपलब्ध नाही. परभणीला उत्तर महाराष्ट्र अथवा विदर्भातून इंधन आणावे लागते. विदर्भातून इंधन परभणीपर्यंत येण्यासाठी किंवा मनमाड मार्गे परभणीत इंधन येण्यासाठीचा खर्च जास्त लागतो. मनमाडवरून परभणीपर्यंतचे अंतर 350 किलोमीटरपर्यंत पडते. हा खर्च वसूल करण्यासाठी परभणीचे पेट्रोलचे दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त दिसून येतात. परभणीनंतरचा जिल्हा म्हणजेच नांदेडचा विचार केल्यास, नांदेडला अकोल्यातून इंधन पुरवठा होतो. मात्र यासाठीचा खर्च त्या तुलनेत कमी येत असल्याने येथे पेट्रोलचे दर ग्राहकांना त्या तुलनेत कमी लावले जातात.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांचे आजचे पेट्रोलचे दर-

मुंबई- 116. 72
अहमदनगर- 116. 69
औरंगाबाद- 116. 81
बीड- 117. 58
धुळे- 116. 43
गडचिरोली- 117. 63
हिंगोली- 118.22
जळगाव- 117. 62
जालना- 118.21
कोल्हापूर- 117.19
लातूर- 117.49
परभणी- 119.74
सोलापूर- 116.82

100 रुपयांपेक्षा जास्त महाग पेट्रोल कुठे?

मागील दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पेट्रोलच्या दरात 9 वेळा वाढ झाली आहे. 22 मार्च नंतर 24 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या दहा दिवसात इंधनाचे दर तब्बल 6.84 रुपयांनी वाढले आहेत. नव्या दरानुसार, मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.

इतर बातम्या-

Gadchiroli : शाळेच्या बसला भरधाव ट्रकची जोरदार धडक, 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

टायगर इज बॅक नाहीतर भालू इज बॅक, ‘नाणार’वरून सतीश सावंतांचे नितेश राणेंवर जहाल आसूड