Amruta Fadnavis : पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाहीत; अमृता फडणवीस यांचा मोठा खुलासा

Amruta Fadnivs : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'देशभरातल्या मुख्यमंत्र्याची पिकनिक दावोसला सुरु आहे' अशी टीका केली होती. आता त्यावर अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

Amruta Fadnavis : पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाहीत; अमृता फडणवीस यांचा मोठा खुलासा
Sanjay Raut
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 21, 2026 | 6:10 PM

राज्यात नुकताच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. जवळपास 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर आता कोणत्या महानगरपालिकेत कुणाचा महापौर बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री हे दावोसला गेले आहेत. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘देशभरातल्या मुख्यमंत्र्याची पिकनिक दावोसला सुरु आहे’ अशी टीका केली. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस यांनी म्हटले की, दावोसला ते बिझनेससाठी गुंतवणुकीसाठी गेलेत. महाराष्ट्राला एक प्लटफॉर्म मिळतोय. ⁠इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. तीन दिवसाची पिकनिक होत नाही. पिकनिकला ते माझ्याशिवाय जाऊ शकत नाही. पुढे अमृता फडणवीस यांनी मुंबईची महापौर कोण होणार याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होणार आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, देशभरातल्या मुख्यमंत्र्याची पिकनिक दावोसला सुरु आहे. ते संपल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापौरच्या निवडणुकीत लक्ष घालतील. स्वित्झर्लंडमधल्या दावोसमधील औद्योगिक कॉन्फरन्स सुरू आहे. ती अत्यंत हास्यास्पद असल्याचे राऊत म्हणाले. अनेक राज्याचे मुख्यमंत्री एकमेकांना देशात न भेटता दावोसला भेटायला जातात, आणि भारतातल्या कंपन्यांनाच दावोसला बोलावून तिथे मुख्यमंत्री करार करतात. तेही जनतेच्या पैशाच्या करावर, अशी टीका राऊतांनी केली आहे, त्याचबरोबर पंतप्रधानांनी यावर लक्ष द्यावं असं आवाहन राऊतांनी केले आहे.

उद्या ठरणार महापौर पदाचे आरक्षण

महापौर कोण होणार याची चर्चा सुरू असली तरी, प्रथम कोणत्या आरक्षण प्रवर्गातील व्यक्ती महापौर होऊ शकते हे निश्चित होणे गरजेचे आहे. त्यानुसार, गुरुवार, २२ जानेवारी रोजी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. हे आरक्षण नव्याने शून्यापासून न काढता, मागील आरक्षणाचा विचार करून चक्राकार पद्धतीने ठरवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.