'गो-एअर'च्या विमानात कबुतर, प्रवाशांचा गोंधळ, एअर हॉस्टेसची धावाधाव

अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या विमानात कबुतर घुसल्याने एकच खळबळ उडाली (Pigeon in go air airlines) होती.

'गो-एअर'च्या विमानात कबुतर, प्रवाशांचा गोंधळ, एअर हॉस्टेसची धावाधाव

अहमदाबाद : अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या विमानात कबुतर घुसल्याने एकच खळबळ उडाली (Pigeon in go air airlines) होती. विमानात कबुतर घुसल्याने प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला होता. विमान उड्डाण घेत असतानाच कबुतर आतामध्ये घुसले होते. त्यामुळे ते थांबवून विमानाचा दरवाजा उघडून त्याला बाहेर सोडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला (Pigeon in go air airlines) आहे.

अहमदाबाद एअरपोर्टवर गो एअरचे विमान जी 8-702 टेक ऑफ करण्यापूर्वी विमानात कबुतर घुसला. कबुतर आतमध्ये इकडे-तिकडे उडत होता. हे पाहून विमानात उपस्थित असलेले क्रू मेंबर्स आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. त्यानंतर विमानाचा दरवाजा उघडून त्याला बाहेर सोडले. प्रवाशांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. प्रवाशांनी हा व्हीडीओही सर्वत्र व्हायरल केला आहे.

याशिवाय विमान जयपूरला 6.45 वाजता न पोहोचता 6.15 ला जयपूर एअरपोर्टवर पोहोचले. अहमदाबादवरुन जयपूर येणाऱ्या विमानात काल संध्याकाळी 4.30 वाजता एप्रिनवर आणले गेले. यावेळी एक-एक प्रवासी विमानात चढत होते. जेव्हा सर्व प्रवाशी विमानात बसले त्यानंतर विमानाचे दरवाजे बंद केले. त्यानंतर 4.50 वाजता विमान उड्डाण घेण्यासाठी रनवे वर येत होते. तेवढ्यात एका प्रवाशाने आपली बॅग ठेवण्यासाठी विमानातील लगेजचे शैल्फ खोलले ज्यामध्ये कबुतर निघाला. कबुतराला विमानात पाहून सर्वांना धक्का बसला. प्रवाशांनी गोंधळही घातला. क्रू मेंबरस्ने काही वेळात प्रवाशांना शांत केले. एअरलाईन्सने या घटनेची माहिती तातडीने ग्राऊंड स्टाफला दिली. यानंतर विमानाचा दरवाजा खोलण्यात आला. यानंतर कबुतर बाहेर पडला. या सर्व प्रकारावरुन एअरलाईन्सचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *